भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी मोठा निकाल; माजी आमदारासह 9 जणांना जन्मठेप

BJP Leader Jaypal Puniya Murder Case Full Verdict Details: राजस्थानमधील भाजप नेते जयपाल पुनिया हत्या प्रकरणात मोठा निकाल लागला असून माजी आमदारासह 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Family members react emotionally after court sentences nine accused, including a former MLA, to life imprisonment in the Jaypal Puniya murder case.
Family members react emotionally after court sentences nine accused, including a former MLA, to life imprisonment in the Jaypal Puniya murder case.saam tv
Published On

राजस्थानमधील बहुचर्चित भाजप नेते जयपाल पुनिया हत्याकांडमध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. एडिजे न्यायालयने चार वर्ष जुन्या खटल्याचा निकाल देत माजी मुख्य आरोपी मोती सिंग, आमदार महेंद्र चौधरी याच्यासह नऊ दोषीना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Family members react emotionally after court sentences nine accused, including a former MLA, to life imprisonment in the Jaypal Puniya murder case.
भाजपमध्ये प्रवेश केलेले 7 खासदार अपात्र ठरणार का? कायदा काय सांगतो? तज्ञ म्हणाले...

दिवसाढवळ्या झालेल्या हत्येमुळे हादरले होते राजस्थान

भाजप नेते जयपाल पुनिया यांची 14 मे 2022 रोजी निर्घृणपणे हत्या केली होती. बोलेरो गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हत्येमुळे राजस्थानमध्ये मोठा हादरा बसला होता. वकील बोदाराम चौधरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली, न्यायालयाने मोती सिंगला खून (कलम ३०२) आणि कट (कलम १२०ब) या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले. संदीप, तेजपाल, कृष्ण कुमार, हारून, रणजीत, राजेश, फारूक आणि दुसरा राजेश या इतर आठ दोषींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने प्रत्येक दोषीवर १,००,००० रुपयांचा दंडही ठोठावला.

Family members react emotionally after court sentences nine accused, including a former MLA, to life imprisonment in the Jaypal Puniya murder case.
Video : जगातल्या मोस्ट वाँटेड दहशतवादी अल-जवाहिरीकडून हिजाब गर्लचं कौतुक

इतर कलमांनुसार (४२७, ३४१ आणि १४८) अतिरिक्त शिक्षा आणि दंडही आकारण्यात आले आहेत. दंड न भरल्यास एक वर्षाचा अतिरिक्त तुरुंगवास भोगावा लागेल. मात्र कुठलाही पुरावा न सापडल्याने दोन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Family members react emotionally after court sentences nine accused, including a former MLA, to life imprisonment in the Jaypal Puniya murder case.
२८ आमदार सोडणार पक्ष; सरकार कोसळण्याची शक्यता, बड्या नेत्याच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

पीडितेच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू

निकालानंतर जयपाल पुनिया यांच्या पत्नी सरिता पुनिया भावुक झाल्या. त्या म्हणाल्या, माझा न्यायव्यवस्थेवर आणि देवावर अढळ विश्वास होता. आज माझ्या पतीला न्याय मिळाला आहे. जे लोक कायदा हातात घेतात, त्यांच्यासाठी हा निकाल एक कडक संदेश आहे, असे त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com