भाजपचे दिग्गज नेते दीपक मोदींची आत्महत्या; राजकारणाला हादरा

Shock in BJP As Visnagar Leader Deepak Modi End Life: भाजपचे विसनगरमधील नगरसेवक दीपक मोदी यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घटना घडली आहे. या घटनेमुळे गुजरातमधील राजकारणात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.
BJP leader Deepak Modi, a councillor from Visnagar, Gujarat, who died by suicide after jumping in front of a train, leaving the political community in shock.
BJP leader Deepak Modi, a councillor from Visnagar, Gujarat, who died by suicide after jumping in front of a train, leaving the political community in shock.saam tv
Published On

अहमदाबाद: भाजपचे नेते दीपक मोदी यांनी आज पहाटे विसनगर शहरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ते विसनगर नगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक होते. त्यांनी पहाटे रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची बातमी पसरताच भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

BJP leader Deepak Modi, a councillor from Visnagar, Gujarat, who died by suicide after jumping in front of a train, leaving the political community in shock.
Political News: बड्या राजकीय नेत्याच्या मृत्यूनं राजकीय वर्तुळात खळबळ; घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विसनगरमधील कंसा NA भागातील गणेश नगर सोसायटीत राहणारे ५४ वर्षीय दीपकभाई मोदी यांनी सकाळी वरेथा-गांधीनगर पॅसेंजर ट्रेनखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पतनी दरवाजा ते मोटल हॉटेल रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ असलेल्या नाल्याजवळ ही दुर्दैवी घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले.

BJP leader Deepak Modi, a councillor from Visnagar, Gujarat, who died by suicide after jumping in front of a train, leaving the political community in shock.
भारताच्या शेजारी देशात लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; सर्वच जण जागीच ठार

दीपकभाई मोदी हे विसनगर पालिकेतील भाजपचे एक सक्रिय नेते होते. नुकत्याच झालेल्या विसनगर नगरपालिकेच्या निवडणुकीत ते प्रभाग क्रमांक १ मधून बिनविरोध निवडून आले होते. त्यांची संघटनात्मक पकड आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा पाहून त्यांच्यावर पालिकेत भाजप पक्षनेतेपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दीपकभाई हे दानशूर व्यक्तीमत्त्वाचे होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सदस्यही होते.

कुटुंब आणि भाजप परिवारावर शोककळा

दीपकभाई मोदी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या पत्नीही यापूर्वी कंसा पंचायत समितीमध्ये सदस्य राहिल्या आहेत. कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या अशा अचानक आणि अकाली जाण्याने मोदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि नातेवाइकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी विसनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला.

BJP leader Deepak Modi, a councillor from Visnagar, Gujarat, who died by suicide after jumping in front of a train, leaving the political community in shock.
Crime News : अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या १५ वर्षांच्या मुलाची आईनंच केली हत्या; एक क्लू अन् हादरवून टाकणारा प्लान उघड

भाजपच्या एका सक्रिय नेत्याच्या मृत्यूची बातमी समजताच विसनगर शहर भाजप अध्यक्ष, जिल्हा भाजप अध्यक्ष, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते रुग्णालयात पोहचले. दीपकभाई यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com