Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते, चंद्रकांत पाटलांची सुरतमध्ये मुक्ताफळे

Chandrakant Patil Shivaji Maharaj statement : छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते, असा दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वाद पेटला.
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj Saam Tv
Published On

Chandrakant Patil Claims Chhatrapati Shivaji Maharaj was Patidar : छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समजाचे होते, असं वक्तव्य गुजरातमधील भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेय. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकारण तापलेय. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावरून खरपूस समाचार घेतलाय. शिवाजी महाराज यांना गुजराती करण्याचा प्रयत्न असल्याचा टोला राऊतांनी केला. महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच भाजप नेत्याच्या या वादग्रस्त वक्तव्याने नवा वाद उफळला आहे.

गुजरातमधील भाजप नेते, केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूरतमधील पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत बोलताना मुक्तफळे उधळली. छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते, याचा मला अभिमान असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलेय. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj
Mumbai Election Violence: मुंबईमध्ये निवडणूक प्रचारात राडा, शिंदेंच्या समर्थकांकडून २ जणांना बेदम मारहाण

सूरत लुटल्याचा सूड घेऊ नका -

चंद्रकांत पाटील यांनी सूरतमध्ये केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीत पडण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पाटील यांचं ते वक्तव्य मी ऐकलं. छत्रपती शिवाजी महाराज यांना गुजराती करण्याचा डाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे, मराठा साम्राज्याचे सेनापती आहेत. राजे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सूरत लुटली त्याचा सूड घेऊ नका, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

Chhatrapati Shivaji Maharaj
Japan earthquake : भूकंपाने जपान हादरले, ६.२ तीव्रतेचे जोरदार झटके, भल्या पहाटे जमीन हादरली

छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ सर्वांनाच माहिती

महायुतीमधील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीही पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ संपूर्ण जगाला आणि भारतीयांना माहिती आहे. त्यामुळे अशी चुकीची वक्तव्य करणं खूपच चुकीचं आणि अयोग्य आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

Chhatrapati Shivaji Maharaj
Suresh Kalmadi : पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com