Train Accident: जोडप्याचे भांडण मिटवायला गेले असता भयंकर घडलं, ट्रेनच्या धडकेत तिघांचा मृत्यू

Rajasthan Train Accident: राजस्थानमध्ये ट्रेनने चार जणांना धडक दिली. या अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला.
Train Accident: जोडप्याचे भांडण मिटवायला गेले असता भयंकर घडलं, ट्रेनच्या धडकेत तिघांचा मृत्यू
Rajasthan Train Accidentsaam tv
Published On: 

राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यात रविवारी भीषण रेल्वे अपघाताची घटना घडली. या रेल्वे अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला आहे. रेल्वे रुळांवर भांडणाऱ्या एका जोडप्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना दोन तरुणांनाही रेल्वेची धडक बसली. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिकानेरच्या जेएन व्यास कॉलनी पोलीि ठाण्याच्या हद्दीतील घरसीसर रेल्वे रुळावर हा अपघात झाला. पोलिसांनी सांगितले की, एक जोडपे रेल्वे रुळावर भांडत होते. त्यांना वाचवण्यासाठी दोन वाटसरूंनी रुळांवर जाऊन ते सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी अचानक एक ट्रेन आली आणि त्या चौघांनाही रेल्वेने धडक दिली. एका मृताची ओळख पटली तर दोन जणांची अद्याप ओळख पटली नाही.

Train Accident: जोडप्याचे भांडण मिटवायला गेले असता भयंकर घडलं, ट्रेनच्या धडकेत तिघांचा मृत्यू
Accident: देवदर्शनापूर्वीच भाविकांवर काळाचा घाला, अनियंत्रित कार नदीत कोसळली; चौघांचा मृत्यू

या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर घटनास्थळी ट्रेन थांबवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच, रेल्वे पोलिस आणि स्थानिक पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Train Accident: जोडप्याचे भांडण मिटवायला गेले असता भयंकर घडलं, ट्रेनच्या धडकेत तिघांचा मृत्यू
Accident: अक्कलकोटला दर्शनाला जाताना काळाचा घाला, अपघातात मुंबईतील तिघांचा मृत्यू

मृतांपैकी एकाची ओळख बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी संजीत मोची म्हणून पटली आहे. इतर दोन पीडितांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिस जखमी व्यक्तीची ओळख पटवण्याचे कामही करत आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून अपघाताच्या सर्व पैलूंविषयी माहिती गोळा करत आहेत. या अपघातामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. दिवाळीच्या दिवशी तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Train Accident: जोडप्याचे भांडण मिटवायला गेले असता भयंकर घडलं, ट्रेनच्या धडकेत तिघांचा मृत्यू
Accident : धनत्रयोदशीला काळाचा घाला, भरधाव ट्रकच्या धडकेत ६ जण जागीच ठार, ७ गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.