ख्रिसमससाठी प्रेयसीला भेटायला गेला अन् जाळ्यात अडकला; गावकऱ्यांनी लावून दिलं लग्न

प्रेमाकरिता खूप जण वाटेल ते करत असतात.
ख्रिसमससाठी प्रेयसीला भेटायला गेला अन् जाळ्यात अडकला; गावकऱ्यांनी लावून दिलं लग्न
ख्रिसमससाठी प्रेयसीला भेटायला गेला अन् जाळ्यात अडकला; गावकऱ्यांनी लावून दिलं लग्नSaam Tv
Published On

वृत्तसंस्था : प्रेमाकरिता खूप जण वाटेल ते करत असतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. ख्रिसमसकरिता गर्लफ्रेंडला भेटायला जाणे एका मुलाला चांगलेच महागात पडले आहे. गावकऱ्यांनी त्याला चांगलच धडा शिकवला असून थेट त्याचे लग्न लावून दिले आहे. ख्रिसमसच्या दिवशी आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलाचे गावकऱ्यांनी जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आपल्या क्लासमध्ये शिकणाऱ्या मुलीबरोबर ओळख झाल्यावर मुलगा तिला भेटायला गेला होता गेला होता. मात्र, गावकऱ्यांना (villagers) ही बाब मान्य नव्हती. यामुळे गावकऱ्यांनी भेटायला आलेल्या मुलाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे जबरदस्तीने लग्न (married) लावण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील (Bihar) परशुरामपूर गावात एक अल्पवयीन मुलगा त्याच्या मैत्रिणीला (friend) भेटण्याकरिता पोहोचला आहे. ते दोघेही एकाच वर्गात होते आणि एकाच कोचिंग क्लासमध्ये (class) शिक्षण घेत होते. कोचिंग क्लासमध्ये दोघांची ओळख झाली होती आणि त्याचे रुपांतर हे मैत्रीमध्ये आणि प्रेमात झाले होते.

हे देखील पहा-

यानंतर हा मुलगा नेहमीच गावात येऊन गर्लफ्रेंडला भेटत असे आणि गप्पा मारत होता. मात्र गावकऱ्यांना ही बाब मान्य नव्हती आणि त्यांना दोघांचे अशा प्रकारे भेटणे आवडत नव्हते. ख्रिसमसच्या निमित्ताने गर्लफ्रेंडला भेटायला आलेल्या मुलाला गावकऱ्यांनी पकडले आणि सर्व ग्रामस्थ एका ठिकाणी गोळा झाले होते. दोघांना गावातील मंदिरामध्ये (temple) नेण्यात आले आणि तिथे त्यांचे जबरदस्तीने लग्न लावण्यात आले आहे. दोघेही अल्पवयीन आहेत, याचा विचार ग्रामस्थांनी केला नाही. आपल्याला सोडून देण्याची विनंती मुलगा वारंवार करत राहिला होता.

ख्रिसमससाठी प्रेयसीला भेटायला गेला अन् जाळ्यात अडकला; गावकऱ्यांनी लावून दिलं लग्न
नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

मात्र, ग्रामस्थ काही ऐकायला तयार नव्हते. या घटनेचा एक व्हिडीओ (Video) देखील सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल होत आहे. जबरदस्तीने अल्पवयीन मुलांचे लग्न लावून देण्याच्या ग्रामस्थांच्या कृत्याचा दोघांच्याही घरच्यांनकडून निषेध करण्यात येत आहे. ग्रामस्थांविरोधामध्ये पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांचे अपहरण करून जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र सध्या या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगत आहे. तर पोलीस अनेकांची कसून चौकशी करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com