नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीSaam Tv

नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
Published on

पुणे : नवले पुलावर (Navale Bridge) होणारी अपघाताची मालिका थांबण्याची चिन्हे अजुन देखील दिसत नाहीत. आज मंगळवारी परत एकदा अपघात (Accident) झाला असून यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. उतारावर कंटेनर (Container) मागे सरकल्याने पाठिमागून येणाऱ्या वाहनांना त्याची धडक बसल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

हे देखील पहा-

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबईकडून (Mumbai) साताऱ्याकडे (Satara) जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक (Break) निकामी झाला. यामुळे चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले होते. त्यानंतर उतारावरून कंटेनर मागे आला असल्याने मागून येत असणाऱ्या तीन ते चार वाहनांना धडक दिली. यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com