मोबाइल फोन ते मतदार ओळखपत्र...निवडणूक प्रक्रियेत तब्बल १७ बदल, निवडणूक आयोगानं यादीच जाहीर केली

Bihar Vidhan Sabha Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. यासोबत आयोगाने निवडणूक प्रक्रियेत झालेल्या १७ बदलांचीही माहिती दिली.
Election 2025
Election 2025x
Published On
Summary
  • बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

  • मतदान दोन टप्प्यांत ६ आणि ११ नोव्हेंबरला होणार

  • आयोगाने निवडणूक प्रक्रियेत जाहीर केले १७ मोठे बदल

Election Commission of India : बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगाने महत्त्वाच्या १७ बदलांची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे. हे १७ बदल बिहार निवडणुकीत राबवले जातील. त्यानंतर त्यांची अंमलबजावणी देशभरात केली जाईल. या नव्या बदलांमळे प्रत्येक मतदान केंद्रावर १,२०० पेक्षा जास्त मतदार राहणार नाही. याशिवाय मतदान केंद्रान मोबाईल फोन ठेवण्याची परवानगीही असेल. मतदार मतदान करण्यासाठी बाहेर त्यांचे फोन जमा करु शकतात आणि नंतर परतताना ते घेऊ शकतात. असे एकूण १७ बदल जाहीर करण्यात आले आहे.

आयोगाद्वारे करण्यात आलेले १७ बदल -

  • १. प्रत्येक मतदान केंद्रावर जास्तीत जास्त मतदारांची मर्यादा १,२०० इतकी असेल.

  • २. सर्व मतदान केंद्रांवर १०० टक्के वेबकास्टिंग असेल.

  • ३. मतदार फोन घेऊन येऊ शकतात, त्याचे फोन जमा करण्यासाठी काउंटर असेल.

  • ४. ईव्हीएम मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत छायाचित्र असेल.

  • ५. बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) आणि निरीक्षकांचे प्रशिक्षण असेल.

  • ६. विशेष सघन पुनरावृत्ती (एसआयआर) यशस्वीरित्या पूर्ण करणे.

  • ७. डिजिटल इंडेक्स कार्डचे जलद वितरण करणे.

  • ८. एक-स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म ठेवणे.

  • ९. १५ दिवसांच्या आत मतदार ओळखपत्रांचे वितरण करणे.

  • १०. बूथ लेव्हल अधिकाऱ्यांसाठी ओळखपत्रे तयार करणे.

  • ११. फॉर्म १७ सी आणि ईव्हीएममध्ये तफावत आढळल्यास व्हीव्हीपॅट मोजणी करणे.

  • १२. पोस्टल मतपत्रिकांची प्राथमिक मतमोजणी करणे.

  • १३. उंच इमारतींमध्ये अतिरिक्त मतदान केंद्रांची सोय करणे.

  • १४. १०० मीटरच्या बाहेर अनधिकृत ओळखपत्र स्लिप बूथची सोय करणे.

  • १५. राजकीय पक्षांच्या बीएलएचा वापर करणे.

  • १६. पोलीस अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देणे.

  • १७. मतदान आणि मतमोजणी कर्मचाऱ्यांचे मानधन दुप्पट करणे.

Election 2025
Cricketer Death : पहिला वर्ल्डकप जिंकणाऱ्या महान क्रिकेटपटूचे निधन

निवडणूक आयोगाद्वारे आज (६ ऑक्टोबर) बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. दिल्लीच्या विज्ञान भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखांबाबतची घोषणा केली. बिहार विधानसभा निवडणूक ही दोन टप्प्यांमध्ये होणार असून त्यातील पहिल्या टप्प्यासाठीचे मतदार ६ नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यासाठीचे मतदान ११ नोव्हेंबरला होईल. मतदानाचा निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होईल.

Election 2025
गौतमी पाटील कारवाईच्या कचाट्यातून 'निसटली'! १०० पेक्षा जास्त CCTV चेक केले, शेवटी पोलिसांना नेमका क्लू मिळाला

निवडणूक आयोगाकडे एकूण ४० अ‍ॅप्स आहेत. हे सर्व ECINET वर उपलब्ध आहेत, असे ज्ञानेश कुमार यांनी सांगितले. आता BLOs शी ECINET द्वारे संपर्क साधता येतो. निवडणूक आयोगाशी संपर्क साधण्यासाठी १९५० वर डायल करता येईल. या क्रमांकावर डायल करण्यापूर्वी +९१ आणि त्या क्षेत्राचा STD कोड वापरावा. राजकीय पक्षांच्या मागणीनुसार आणि पारदर्शकतेसाठी आयोगाने ईव्हीएम मतमोजणीच्या शेवटच्या दोन फेऱ्यांपूर्वी पोस्टल मतपत्रिका मोजणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

Election 2025
IND Vs PAK सामना 'या' हल्ल्यामुळे थांबला, स्टेडियम धुराने भरले; पाहा नेमकं काय घडलं? VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com