Train Fire : बिहारमध्ये पॅसेंजर ट्रेनला अचानक आग; रेल्वे स्थानकावर प्रवाशांची पळापळ अन्...

Sasaram Railway Station News : बिहारमधील सासाराम रेल्वे स्थानकावर पाटणाकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनच्या डब्याला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.
Bihar passenger train fire
A passenger train coach engulfed in flames at Sasaram railway station in Bihar.
Published On

Bihar passenger train catches fire : सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे गाडीला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी मध्य प्रदेशात तिरुवनंतपुरम-हजरत निझामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला आग लागल्याची घटना ताजी असतानाच, आज (सोमवारी) सकाळी एका पॅसेंजर ट्रेनला आग लागली. बिहारमधील सासारामहून पाटणाकडे जाणाऱ्या या पॅसेंजर ट्रेनला अचानक आग लागल्याने रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, जीव वाचवण्यासाठी त्यांची एकच पळापळ झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय

पॅसेंजर ट्रेनला लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रेल्वे पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात असून, तपासानंतरच खरे कारण समोर येईल. रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) दिलेल्या माहितीनुसार, तपास पूर्ण झाल्यावरच अधिकृत माहिती जाहीर केली जाईल. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार सासाराम-पाटणा फास्ट पॅसेंजर ट्रेनच्या एका डब्यात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा संशय आहे.

Bihar passenger train fire
जिल्हा परिषद भरतीत महाघोटाळा? बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावर मिळवली सरकारी नोकरी, महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्लॅटफॉर्मवर गाडी असतानाच लागली आग

ही दुर्घटना सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. सासाराम रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर गाडी उभी असतानाच डब्याला आग लागल्याचे प्रवाशांच्या निदर्शनासाठी आले. त्यामुळे प्रवाशांना तात्काळ सुखरूप बाहेर पडता आले. जर ही आग धावत्या ट्रेनला लागली असती, तर मोठी जीवितहानी झाली असती.

Bihar passenger train fire
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा भीषण अपघात, मनसे नेत्याच्या फॉर्च्युनरचा चक्काचूर

आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, रेल्वेचा एक संपूर्ण डबा जळून खाक झाला आहे. या घटनेचे व्हिडिओही समोर आले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. तत्पूर्वी, खबरदारीचा उपाय म्हणून आग लागलेला डबा (बोगी) मुख्य ट्रेनपासून वेगळा करण्यात आला होता. रेल्वे प्रशासनाने या घटनेच्या सखोल तपासाचे आदेश दिले असून, सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Bihar passenger train fire
Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com