Train Fire : स्टेशनवर ट्रेन पोहोचताच इंजिनला भीषण आग, डब्यांमध्ये पसरला धूर; प्रवाशांनी खिडक्या-दारातून मारल्या उड्या

Passenger train engine catches fire in Bihar : बिहारच्या सिमरी बख्तियारपूर रेल्वे स्थानकावर पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनला भीषण आग लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. धूर डब्यांमध्ये पसरल्यानंतर प्रवाशांनी खिडक्या आणि दरवाज्यांतून बाहेर उड्या मारून जीव वाचवला.
Passenger train engine catches fire in Bihar
Passenger train engine catches fire in BiharSaam TV marathi
Published On

Bihar Simri Bakhtiyarpur Station Train Fire : बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील सिमरी बख्तियारपूर रेल्वे स्टेशनवर भल्या पहाटेच आगीची भीषण घटना घडली. समस्तीपूर-सहरसा (६३३४४) पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनला पहाचे तीन वाजताच्या आसपास अचानक भीषण आग लागली. पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण केले आणि धुराचे लोट थेट ट्रेनच्या डब्यांपर्यंत पोहोचले. इंजिनसोबत आगीची धग चार ते पाच डब्ब्यांपर्यंत पोहचली होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे ट्रेनमधील प्रवाशी प्रचंड घबरले आणि जीव वाचवण्यासाठी खिडक्या व दारांतून बाहेर उड्या मारण्यास सुरुवात केली.

आगीची माहिती मिळताच स्टेशन परिसर आणि रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. सुदैवाने प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आणि तातडीने केलेल्या बचावकार्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. या घटनेमुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

Passenger train engine catches fire in Bihar
Ladki Bahin Yojana: तब्बल इतक्या लाख महिला झटक्यात योजनेतून बाहेर, अधिकृत डेटा जाहीर, तुमचे नाव यात नाही ना?

मिळालेल्या माहितीनुसार, सिमरी बख्तियारपूर स्टेशनवर पॅसेंजर ट्रेन पोहोचताच इंजिनमधून धूर निघू लागला. ही आग झपाट्याने तीन डब्यांमध्ये पसरली. आगीची दुर्घटना घडली त्यावेळी बहुतेक प्रवासी गाढ झोपेत होते. पण सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.

Passenger train engine catches fire in Bihar
Weather Alert : राज्यातील ११ जिल्ह्यांत २४ तास मुसळधार; विजांच्या कडकडाटासह धुमाकूळ घालणार पाऊस, IMD चा अंदाज

आग आणि धुराची माहिती मिळताच ट्रेनमध्ये घबराट पसरली. प्रवासी ट्रेनला आग लागल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. प्रवासी तात्काळ खाली उतरू लागले. सर्व प्रवासी वेळेत ट्रेनमधून बाहेर पडू शकले. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

Passenger train engine catches fire in Bihar
Maharashtra Politics : मोठी बातमी! ठाकरेंच्या विश्वासू शिलेदारावर गुन्हा दाखल, महाराष्ट्रात खळबळ

ट्रेनला आग लागल्याची माहिती मिळताच, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सिमरी बख्तियारपूर रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतूक सकाळी ६ वाजल्यानंतर पुन्हा सुरू झाली. रेल्वे अधिकाऱ्यांनी अद्याप आगीचे कोणतेही कारण दिलेले नाही. या दुर्घटनेचा तपास सुरू आहे. तपासानंतरच आग कशी लागली, याबाबतचे कारण समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com