Maharashtra Politics : मोठी बातमी! ठाकरेंच्या विश्वासू शिलेदारावर गुन्हा दाखल, महाराष्ट्रात खळबळ

FIR against Sanjay Raut in Solapur : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयकुमार गोरे यांच्याविरोधातील कथित अवमानकारक वक्तव्यांप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.
Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut faces a police case in Solapur over alleged remarks against Minister Jaykumar Gore.
Police register a case against Sanjay Raut in Solapur over alleged remarksसाम टीव्ही मराठी
Published On

Sanjay Raut, Jaykumar Gore controversy : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार व नेते संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात अवमानकारक व्यक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे सोलापूर महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल झालाय.

प्रकरण काय आहे?

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात बोलताना संजय राऊत यांनी अवमानकारक व अपशब्द (शिवीगाळ) वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) सोलापूर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी संजय राऊत यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut faces a police case in Solapur over alleged remarks against Minister Jaykumar Gore.
एसटी महामंडळाला विठुराया पावला! पंढरपूर वारीतून तब्बल 'इतक्या' कोटींचं उत्पन्न, सरनाईकांची माहिती

मनीष केत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संजय राऊत यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खालील कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. कलम ३५६(२) (मानहानी/अवमानकारक वक्तव्य करणे), कलम ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे/अपशब्द वापरणे) यांतर्गंत राऊतांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. याप्रकरणी सोलापूरचे फौजदार चावडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut faces a police case in Solapur over alleged remarks against Minister Jaykumar Gore.
Weather Alert : राज्यातील ११ जिल्ह्यांत २४ तास मुसळधार; विजांच्या कडकडाटासह धुमाकूळ घालणार पाऊस, IMD चा अंदाज

उद्धव ठाकरेंनी धनुष्यबाण स्वतःच्याच छातीत मारून घेतला – सदाभाऊ खोतांचा घणाघात

सदाभाऊ खोत यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक वक्तव्ये केली. "जयकुमार गोरे हे लोकमातातून निवडून आलेले आमदार आहेत, ते शेर आहेत; त्यांचा नाद कोल्ह्या-कुत्र्याने करू नये. संजय राऊत यांचे तोंड म्हणजे गटारगंगा आहे, तिथे स्वच्छ पाणी मिळेल अशी अपेक्षाच करू नये." असा टोला त्यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com