चैनी खैनीनं घेतला जीव! तंबाखू थुंकायला गेलेल्या व्यक्तीला वंदे भारत ट्रेननं उडवलं

Vande Bharat Train Hit Man: बिहारच्या एका रेल्वे स्थानकावर एक दुःखद घटना घडली आहे. रेल्वे रुळांजवळ तंबाखू थुंकण्याचा प्रयत्न करत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या वंदे भारत ट्रेनने धडक दिली.
चैनी खैनीनं घेतला जीव! तंबाखू थुंकायला गेलेल्या व्यक्तीला वंदे भारत ट्रेननं उडवलं
Published On
Summary
  • बाढ रेल्वे स्टेशनवर दुर्दैवी अपघात

  • तंबाखू थुंकण्यासाठी रुळाजवळ गेल्याने जीव गमावला

  • वेगवान वंदे भारत ट्रेनची जोरदार धडक

चैनी खाण्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे.तुम्ही म्हणाल तर कर्करोगामुळे जीव गमवावा लागला असेल. पण आजारामुळे नाही तर रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला आहे.पटना जवळील बाढ रेल्वे स्टेशनवर एक व्यक्ती तोंडातील तंबाखू थुंकण्यासाठी रेल्वेच्या रुळाकडे गेला, त्याचवेळी मागून येणाऱ्या एका वंदे भारत एक्स्प्रेसनं त्याला उडवलं. या दुर्घटनेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

चैनी खैनीनं घेतला जीव! तंबाखू थुंकायला गेलेल्या व्यक्तीला वंदे भारत ट्रेननं उडवलं
New Rule : मोदी सरकारचा मोठा निर्णय, PNG कनेक्शन असेल तर LPG गॅस सिलिंडर बंद

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी वंदे भारत ट्रेन पटनाकडून बाढ रेल्वे स्टेशनवर येत होते, त्याचवेळी स्टेशनवर बसलेला व्यक्ती आपल्या तोंडातील तंबाखू थुंकण्यासाठी प्लॅटफॉर्मवरून रेल्वे रुळाकडे गेला आणि थुंकण्यासाठी वाकला त्याचवेळी मागून आलेल्या ट्रेननं त्याला उडवलं. ट्रेन वेगात होती, त्यामुळे त्या व्यक्तीला वेळेआधीच मागे फिरता आले नाही. काही कळेना आधीच त्याला ट्रेननं उडवलं होतं.

चैनी खैनीनं घेतला जीव! तंबाखू थुंकायला गेलेल्या व्यक्तीला वंदे भारत ट्रेननं उडवलं
Free Ticket : वंदे भारत-तेजस एक्सप्रेसचा मोफत तिकिटाने प्रवास, चहा-नाश्ता अन् जेवणही फुकटात, वाचा योजना नक्की आहे काय?

घटना घडल्यानंतर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची आरडाओरड आणि पळापळी झाली.या दुर्घटनेनंतर तेथे लोहमार्ग पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी त्या व्यक्तीला बाढ येथील रुग्णालयात दाखल केलं. तेथे डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे मोठं प्रयत्न केले. परंतु उपचारादरम्यान त्या व्यक्तीचं निधन झालं.

या आधी एका शिक्षकाचाही रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला होता.परसा बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वे धडकली होती, त्यात त्यांचा मृत्यू झाला.हा अपघात मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कुर्थौल ब्रह्मस्थानजवळ घडला. मृत शिक्षकाचे नाव सूर्यकांत आर्य (३५) असून ते सारणमधील जलालपूर नवादा मथिया येथील रहिवासी होते. ते सध्या पुनपुन येथील शेखपुरा येथील सुधारित माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते पाटणा येथील जक्कनपूरमधील न्यू पुरेंद्रपूर येथे राहत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com