बदलीचा सपाटा! 6 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

Bihar IAS Reshuffle 2026 Six Officers Transferred And New Postings: बिहार सरकारने सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करत नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. उज्ज्वल कुमार सिंह, श्रीकांत शास्त्री, विवेक रंजन, नितीन कुमार सिंह, नीलिमा साहू आणि दिव्या शक्ती यांना नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
Bihar IAS Reshuffle 6 IAS Officers Transferred, Check New Posting List
Bihar IAS Reshuffle 6 IAS Officers Transferred, Check New Posting Listsaam tv
Published On

बिहार सरकारने पुन्हा एकदा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून सहा अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या देण्यात आली आहेत. सरकारने शुक्रवारी या संदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली. या फेरबदलांत नवादा आणि कैमुर येथील उपविकास आयुक्तांचाही समावेश आहे. 2011 बॅचचे IAS अधिकारी आणि पशुपालन विभागाचे संचालक उज्ज्वल कुमार सिंह यांची ग्रामीण विकास विभागात विशेष सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले 2012 बॅचचे IAS अधिकारी श्रीकांत शास्त्री यांना पशुपालन विभागाच्या संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी ते बेगूसरायचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. गेल्या आठवड्यात त्यांची बेगूसराय येथून बदली करण्यात आली होती.

Bihar IAS Reshuffle 6 IAS Officers Transferred, Check New Posting List
32 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी प्रशासनात खळबळ; महापालिकांचे आयुक्त बदलले

सिवानचे जिल्हाधिकारी राहिलेले 2017 बॅचचे IAS अधिकारी विवेक रंजन यांची माहिती आणि जनसंपर्क विभागात अपर सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले 2018 बॅचचे आयएएस अधिकारी नितीन कुमार सिंह यांना माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक बनवण्यात आले आहे.

नवादा आणि कैमूरच्या डीडीसींच्याही बदल्या

2021 बॅचच्या आयएएस अधिकारी आणि सध्या नवादाच्या उपविकास आयुक्त असलेल्या नीलिमा साहू यांची आरोग्य विभागात संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Bihar IAS Reshuffle 6 IAS Officers Transferred, Check New Posting List
बदली एक्सप्रेस सुसाट! 6 IAS अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या; कोणाची कुठे झाली नियुक्ती?

तर कैमूरच्या उपविकास आयुक्त आणि 2022 बॅचच्या आयएएस अधिकारी दिव्या शक्ती यांची उत्पादन व मद्यनिषेध विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी पाटण्यातही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बिहार प्रशासनिक सेवेतील अधिकाऱ्यांनाही नव्या पदांवर नियुक्ती देण्यात आली आहे. आता पुन्हा झालेल्या या सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com