Bihar Elections: भाजपचं पुन्हा धक्का तंत्र! विधानसभा अध्यक्ष, मंत्र्यांना डच्चू; तरुणांना उमेदवारी देत खेळला मोठा डाव

Bihar Elections 2025: उमेदवारांची यादी जाहीर करत बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने बिगुल फुंकलंय. भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत ७१ उमेदवारांची नावे आहेत.
Bihar Elections 2025
BJP announces 71 candidates for Bihar polls, replacing senior leaders with young hopefuls in a bold political move.saam tv
Published On
Summary
  • भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

  • नंदकिशोर यादव आणि मोतीवाल यादव यांसारख्या वरिष्ठ नेत्यांची नावं कापण्यात आली आहेत.

  • भाजपने तरुण उमेदवारांना मोठी संधी देत राजकीय धक्का तंत्र राबवलं.

बिहार राज्यात निवडणुकीचे वारे वाहत आहे. भाजपने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ७१ उमेदवारांची नावे आहेत. उमेदवारांची यादी जाहीर करत भाजपने निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना तारापूर आणि विजय सिन्हा यांना लखीसराय येथून तिकीट देण्यात आलंय. त्याचवेळी भाजपने अनेक प्रमुख उमेदवारांची नावे वगळली आहेत.

Bihar Elections 2025
Bihar Election: बिहार निवडणुकीसाठी भाजपकडून ७१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ९ महिलांना संधी

या यादीमधील सर्वात मोठं नाव म्हणजे अध्यक्ष नंदकिशोर यादव आणि मंत्री मोतीवाल यादव यांचे आहे. या दोघांची नाव कापण्यात आले आहे. भाजप मंत्री आणि जंत्रींना उमेदवारी देण्याऐवजी तरुण उमेदवारांना संधी देत मोठा डाव खेळलाय. भाजपने बिहारमधील २४३ जागांसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे.

पहिल्या यादीत पाटणा साहिबमधून नंद किशोर यादव, आरामधून ज्येष्ठ आमदार अमरेंद्र प्रताप सिंह, रीगामधून मंत्री मोतीलाल प्रसाद यांच्या नावाचा समावेश आहे. औराई येथील रामसुरत राय आणि अररियातील नरपतगंज येथील जयप्रकाश यादव यांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत.

नंदकिशोर यादव यांच्या जागी आता रत्नेश कुशवाहा हे पाटणा साहिबमधून निवडणूक लढवत आहेत. तर ज्येष्ठ आमदार अमरेंद्र प्रताप सिंह यांना डच्चू देण्यात आलाय. आरा येथून त्यांचे तिकीट कापण्यात आले आहे. रिगा जागेवरून वैद्यनाथ प्रसाद यांना संधी देण्यात आली आहे. तर मंत्री मोतीलाल प्रसाद यांचे तिकीट कापण्यात आले आहे. औराई येथील रामसूरत राय यांची जागी रमा निषाद यांना संधी देण्यात आली आहे. तर अररियातील नरपतगंज येथे जयप्रकाश यादव यांच्या ऐवजी देवंती यादव यांना तिकीट देण्यात आले आहे.

Bihar Elections 2025
Explainer: पक्षांत्तर, महत्त्वकांक्षा की मतांची खेळी? संग्राम जगताप यांच्यातील हिंदुत्व जागं होण्यामागील राजकीय अर्थ काय?

९ महिलांना उमेदवारीची संधी

भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये ९ महिला उमेदवारांचा समावेश आहे.

बेतियामधून रेणू देवी

परेहारमधून गायत्री देवी

नरपतगंज- देवंती यादव

किशनगंज- स्वीटी सिंह

प्राणपूर- निशा सिंगह,

कोढा - कविता देवी,

औराई - रमा निषाद,

वारसलीगंज येथून अरुणा देवी

जमुई येथून श्रेयसी सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com