Explainer: पक्षांत्तर, महत्त्वकांक्षा की मतांची खेळी? संग्राम जगताप यांच्यातील हिंदुत्व जागं होण्यामागील राजकीय अर्थ काय?

NCP MLA Sangram Jagtap : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप अचानक हिंदुत्वाकडे वळल्याने राजकीय प्रश्न उपस्थित होत आहेत. ही महत्त्वाकांक्षा आहे, की मतांची रणनीती आहे की निष्ठा बदलण्याचे लक्षणे? हे जाणून घेऊ.
NCP MLA  Sangram Jagtap
Sangram Jagtap’s sudden Hindutva pitch sparks speculation over political motives amid Ajit Pawar’s warning.saam tv
Published On

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे चर्चेत आहेत. आहिल्यानगरमधील मुस्लिम जनतेसोबत राहणारे जगताप घराण्याचे संग्राम जगताप हिंदु्त्ववादी का झालेत? पुरोगामी असलेल्या नेत्याला अचानक हिंदू नेता म्हणून ओळख का निर्माण करू वाटू लागत आहे. दरम्यान त्यांच्या भाषणामुळे पक्ष प्रमुख अजित पवार नाराज झाले असून त्यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तरीही संग्राम जगताप हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

नेहमीच हिंदू-मुस्लीम मतदारांनासोबत धरून राजकारण करणारे संग्राम जगताप एकाच बाजुला का झुकत आहेत. त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायचाय का? हिंदू नेता म्हणून उदयास यायचंय का? संग्राम जगताप यांच्या विधानांचा आणि त्यांचे हिंदुत्व जागं होण्यामागील राजकीय अर्थ काय? हे जाणून घेऊ. अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप हे काही दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केलाय.

संग्राम जगताप यांची भूमिका पाहता किंवा भाषणावेळी त्यांच्या गळ्याभोवती भगवा रुमाल, डोक्यावर भगवी टोपी पाहता ते पक्षात्तरांच्या तयारीत आहेत असा अंदाज तुम्हीही लावाल. पण भाजप प्रवेश हाच संग्राम जगताप यांचा उद्देश आहे? त्यांचा राजकीय खेळ नेमका काय हे जाणून घेऊ.

अहिल्यानगरमधील राजकारणाचा इतिहास आणि संग्राम यांची खाली झोळी

जगताप कुटुंबाचा प्रभाव अहिल्यानगर जिल्ह्यात थोडा बहुत प्रमाणात राहिलाय. येथे १९९० पासून शिवसेनाचा गड असलेल्या आहिल्यानगरमध्ये संग्राम जगताप यांनी सुरुंग लावला. इतकेच नाहीतर भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांशी जोरदार टक्कर देण्याची ताकद संग्राम जगताप यांच्यात आहे. संग्राम जगताप राधाकृष्ण विखे पाटील आणि सत्यजीत तांबे यांना जबरदस्त लढत देण्यास पात्र आहेत.

२०१४ मध्ये मोदींची लाट असतानाही संग्राम जगताप यांनी अनिल राठोड यांना पराभूत करत आमदारकी मिळवली. त्यानंतर २०१९, नंतर २०२४ मध्येही संग्राम जगताप हे निवडून आले. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून त्यांना आपली ओळख एक आमदार आणि आहिल्यानगर पर्यंतच ठेवता आली. तीनवेळा आमदारी मिळवूनही त्यांना पक्षातून मोठी जबाबदारी मिळाली नाही. संग्राम जगताप यांचे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी चांगले संबंध असताना सुद्धा त्यांनी अजित पवार गटासोबत जाणे पसंत केलं. दुसरीकडे तीनदा आमदारकी मिळूनही अजित पवार यांनी मंत्री पद न दिले नाही.

NCP MLA  Sangram Jagtap
Konkan Politics: अखेर वैभव खेडेकरांचा भाजपमध्ये प्रवेश, तीनवेळा हुकला होता मुर्हूत

२०२४ पर्यंत शाहू, फुले आंबेडकर विचारधारेचे आमदार

संग्राम जगताप यांनी २०१४ पासून ते २०२४ पर्यंत पुरोगामी नेता म्हणून आपली ओखळ कायम ठेवली. मात्र अचानक त्यांना हिंदू नेता म्हणून ओळख निर्माण करण्याची गरज का वाटत आहे. या गरजेमागील कारण असू शकतं, त्यांची मंत्रिपदाची महत्त्वकांक्षा आणि एक आमदार पलीकडची ओळख. तीनदा आमदार झाल्यानंतर ही आपली ओळख जिल्ह्यापूरतीच मर्यादित असल्यानं संग्राम जगताप यांनी नवी मार्ग स्विकारला असावा.

संग्राम जगताप यांना जिल्ह्याच्या बाहेर राजकीय ओळख न्यायचीय. त्यामुळेच त्यांनी हिंदूत्वाची कास पकडलीय. मराठा नेता आणि त्यात हिंदू म्हणून नेता ओळख निर्माण केली तर दिल्लीतून काहीतरी मोठा निर्णय होईल असा अंदाज त्यांना वाटत असावा.

मुस्लीम मते गमावली, अन्...

शिवसेनेच्या सत्तेला सुरूंग लावत संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीला विजय मिळवून दिला. २०१४ ते २०१९ पर्यंत मुस्लीम मतांच्या जोरावर संग्राम जगताप यांनी आमदारकी मिळवली. संग्राम जगताप यांचे वडील अरूण जगताप यांनी मुस्लीम मतदारांना जवळ केल्यामुळे त्यांचा पराभव झाला होता. पण २०१४ मध्ये हिंदू मतांमधील विभागणी आणि मुस्लीम जनतेची साथ संग्राम जगताप यांना मिळाली. मात्र यावेळच्या निवडणुकीत चित्र वेगळं होतं.

आधी भाजप आणि शिवसेनेशी दोन हात करणाऱ्या राष्ट्रवादीनं आता महायुतीत हातमिळवणी केली होती. त्यामुळे ही निवडणूक संग्राम जगताप यांच्यासाठी आव्हानात्मक ठरली. ज्या मुस्लीम मतांनी ते निवडणून येत होते, त्यांच्याकडून त्यांना फक्त अडीच हजार मते मिळाली. मात्र कधीच न मिळालेली हिंदू मतदारांची मते अधिक मिळाली. हिंदूत्वाच मुद्दाच आपल्या पथ्यावर पडल्याचं संग्राम जगताप यांच्या लक्षात आलं.

राजकारणाचा पॅटर्न १८० अंशात बदलले

आधी शरद पवारांसोबत असलेल्या संग्राम जगताप यांचा राजकारण हिंदू-मुस्लिम तरुण कार्यकर्त्यांभोवती फिरत होते. पण गेल्या निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांना मुस्लिम बहुल भागामध्ये अतिशय कमी मतदान पडले आणि संग्राम जगताप हे हिंदुत्वाकडे झुकले आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर संग्राम जगताप अचानक बदलले.

प्रखर हिंदुत्व स्वीकारत आक्रमक पवित्रा घेत आहेत. याची सुरुवात सिद्धटेक येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरासमोर असलेल्या मुस्लिम धार्मिक स्थळ जगताप यांनी उखडून टाकले. यानंतर मढी येथे मुस्लिम समाजाकडून कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात भूमिका घेतली.

काय आहे राजकीय खेळी

दीर्घकाळ राजकारण करायचं असेल तर भाजपशिवाय प्रयत्न नाहीये, ही बाब संग्राम जगताप यांना समजली असेल. दुसरीकडे भाजपला हिंदूचं राजकारण करायचं आहे. त्यासाठी भाजपला अशी हिंदू चेहऱ्याची गरज आहे. उत्तर प्रदेश असो आसाम भाजपने हिंदूत्वला पुरक असे मुख्यमंत्री राज्याच्या राजकारणात बसवली आहेत. आता महाराष्ट्रातील जेथे भाजपचं कधीच सत्ता नव्हती तेथे संग्राम जगताप यांना गळ घालत असल्याचं दिसत आहे. कारण संग्राम जगताप यांना कारखाना राजकारण,मराठा समाजाची पार्श्वभूमी आहे. हे समीकरण भाजपसाठी फायदेशीर ठरणारे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com