

जन सूराजचे उमेदवार चंद्रशेखर सिंह यांचे मतमोजणीदरम्यान निधन
प्रचारादरम्यानच चंद्रशेखर सिंह यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला होता.
चंद्रशेखर सिंह यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते.
बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाले.ऐन मत मोजणीच्यावेळी एक दुखद घटना घडलीय.भोजपूर जिल्ह्यातील तारारी विधानसभा मतदारसंघातील जन सूराजच्या उमेदवाराचा मृत्यू झालाय. ही घटना तेव्हा घडली जेव्हा मत मोजणीची प्रक्रिया पार पडत होती. चंद्रशेखर सिंह असे या उमेदवाराचे नाव आहे. शुक्रवारी संध्याकाळी पाटणा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
जन सूराज पक्ष उमेदवाराचे एजंट आणि शेतकरी नेते छोटे सिंग यांनी फोनवरून त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. चंद्रशेखर सिंह हे निवृत्त मुख्याध्यापक होते. निवडणुकीचे निकाल जाहीर झाले तेव्हा त्यांना २,२७१ मते मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी निवडणूक प्रचारादरम्यान, जेएसयू उमेदवार चंद्रशेखर सिंह यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना ताबडतोब पाटण्यातील एका मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु दुपारी त्यांची प्रकृती खालावली. त्यांना दुपारी ४ वाजता दुसरा हृदयविकाराचा पुन्हा झटका आला. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले परंतु त्यांना यश आले नाही. सायंकाळी ७ वाजता चंद्रशेखर सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. चंद्रशेखर सिंह हे तारारी येथील कुरमुरी गावचे रहिवासी होते. ते यापूर्वी शिक्षक संघाचे सक्रिय पदाधिकारी होते. ब्रह्मर्षी समाजाचे राज्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
दरम्यान, बिहार निवडणुकीत एनडीएने प्रचंड विजय मिळवलाय. २०० हून अधिक जागा एनडीएने जिंकल्या. यामध्ये भाजपचा जवळपास ९०% स्ट्राइक रेट होता. जेडीयूनेही जोरदार पुनरागमन केले. महाआघाडीला ३५ जागांपेक्षा जास्त जागाही मिळवता आल्या नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.