Bihar Election: निवडणुकीचं बिगुल आज वाजणार, आयोग करणार मोठी घोषणा, १७ मोठे बदल होणार

Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा आज दुपारी ४ वाजता होणार आहे. निवडणूक आयोगाकडून यावेळी १७ मोठे बदल जाहीर करण्यात येणार आहेत. या बदलांनंतर बिहारमध्ये आज रात्रीपासून आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे.
Bihar Elections
Election Commission to announce Bihar Assembly Election 2025 dates today at 4 PM; 17 new reforms to be implemented for smooth polling.Saam TV Marathi News
Published On

Bihar election 2025 date announcement today : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची प्रतीक्षा आज संपणार आहे. निवडणूक आयोग आज दुपारी चार वाजता बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. राजकीय पक्षाच्या सल्ल्यानंतर विधानसभा निवडणूक कमी टप्प्यात घेण्याचा आयोगाचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी आयोगाकडून बिहारचा दौरा करण्यात आला. त्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला अन् राजकीय पक्षासोबत चर्चाही झाली. त्यानंतर आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा करण्यात येणार आहे. निवडणुकीची घोषणा केल्यानंतर बिहारमध्ये आजरात्रीपासूनच आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे.

२४३ जागांसाठी २०२० मध्ये झालेली बिहार विधानसभा निवडणूक तीन टप्प्यात पार पडली होती. यावेळी दोन टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. दिवाळी आणि छठ सणामुळे निवडणूक तात्काळ उरकण्याची शक्यता आहे. सत्ताधारी एनडीएकडून एकाच टप्प्यात निवडणूक घेण्याची मागणी केली आहे, तर विरोधी पक्षाकडून दोन टप्प्याची मागणी केली आहे. दिवाळी अन् छठ मुळे २५ ऑक्टोबर नंतरच राज्यातील निवडणुका घेण्याची विनंती प्रत्येक पक्षाने केली आहे. २० नोव्हेंबर रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळू शकतो.

Bihar Elections
तटकरेंच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांना धक्का, महत्त्वाच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

बिहारसाठी महत्त्वाचे बदल-

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाकडून महत्त्वाचे १७ बदल करण्यात येणार आहेत. याबाबत आज आयोगाकडून अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील हे महत्त्वाचे बदल यानंतर संपूर्ण देशभरात लागू केले जाणार आहेत.

  • बिहारमधील सर्व ९०,००० हून अधिक मतदान केंद्रांवर प्रथमच १००% लाइव्ह वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • मतदानानंतर पोलिंग एजंटांना देण्यात येणाऱ्या फॉर्म १७सी मध्ये जर ईव्हीएमच्या मतमोजणी युनिटमध्ये कोणताही फरक आढळला, तर अशा परिस्थितीत व्हीव्हीपॅटचीही मोजणी केली जाईल.

  • टपाल मतपत्रांची मोजणी ईव्हीएमच्या शेवटच्या दोन फेऱ्यांपूर्वी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ईव्हीएमच्या शेवटच्या दोन फेऱ्या त्यानंतरच सुरू होतील.

  • डिजिटल इंडेक्स कार्ड निवडणुकीनंतर काही दिवसांतच सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध होईल. मतदात्यांना १५ दिवसांच्या आत नवीन मतदाता ओळखपत्र (ईपिक) मिळवण्याची व्यवस्था सुनिश्चित करण्यात आली आहे.

  • विविध प्रकारच्या अर्जांसाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले आहे, ज्याचे नाव आहे वन स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म ईसीआय नेट. याची प्रगतिशील अंमलबजावणी सध्या सुरू आहे.

  • बिहारमध्ये १,२०० मतदात्यांसाठी एक मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. आता ही व्यवस्था संपूर्ण देशात लागू केली जाईल.

  • सर्व उमेदवारांना मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतरावर पोलिंग स्टेशन उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  • मतदानासाठी ईव्हीएमच्या मतपत्रिकेवर प्रथमच उमेदवारांचे रंगीत फोटो आणि मोठ्या अक्षरात अनुक्रमांक छापण्यात आले आहेत.

Bihar Elections
Maharashtra Live News Update : देवा भाऊ सरकारने आता आनंदाचा शिध्यावर गदा आणली- रोहित पवार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com