तटकरेंच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांना धक्का, महत्त्वाच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

Ajit Pawar NCP setback in Raigad : रायगड जिल्ह्यात तटकरेंच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. रोह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सात महत्त्वाचे नेते भरत गोगावले यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले.
Ajit Pawar
MAJOR SETBACK FOR AJIT PAWAR IN TATKARE STRONGHOLD AS KEY NCP LEADERS JOIN SHIV SENASaam tv
Published On

सचिन कदम, रायगड प्रतिनिधी

NCP leaders join Shinde-led Shiv Sena : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. रोह्यामधील महत्त्वाच्या सात नेत्यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे. रविवारी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आगामी निवडणुकीच्या आधी हा शिंदेंच्या शिवसेनेसाठी रोह्यात मोठा धक्का मानला जातोय. दुसरीकडे मंत्री भर गोगावले यांची ताकद वाढल्याचे बोलले जातेय. रायगड जिल्ह्यात तटकरे अन् गोगावले यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे. रायगडमध्ये शिवसेना अन् राष्ट्रवादी काँग्रेस स्वातंत्र्य निवडणुका लढवणार आहेत. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य दया पवार यांच्यासह रोठ ग्रामपंचायतीच्या नऊ सदस्य पैकी सात सदस्य राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झाले आहेत. रविवारी पक्ष प्रवेश झाला. (Raigad political updates before local body elections)

रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या मतदार संघात राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे. येथील राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य दया पवार यांच्यासह रोठ ग्राम पंचायतीच्या नऊ सदस्यांपैकी सात सदस्य राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करीत शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसेना उपनेते मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. दया पवार यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. हा तटकरेंना मोठा धक्का मानला जातोय. यामुळे तटकरेंच्या रोह्यात शिवसेनेची ताकद वाढताना दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशांना अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

Ajit Pawar
पीएचडी, नेट, सेट आहे, तरीही जॉब नाही; राज्यात प्राध्यापकांच्या 12 हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त

एक दिवस ह्यांना डावळल नाही म्हणजे झालं; गोगावले यांच तटकरेंबाबत मोठ विधान

रोह्यातील कार्यक्रमा पाठोपाठ माणगाव आणि इंदापुरमधील बायपासच्या भुमीपूजन कार्यक्रमात राष्ट्रवादीने मंत्री भरत गोगावले यांना डावलले. यावर बोलताना आम्ही त्यांच्यावर अवलंबून नाही, असे किती येतील आणि जातील, एक दिवस ह्यांना लोकांनी डावलले नाही म्हणजे झालं. असं सांगताना त्यांनी त्याचा विचार करावा असा सल्ला गोगावले यांनी तटकरे यांना दिला आहे.

Ajit Pawar
Maharashtra politics : नालायक वृत्तीला विरोधच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर भाजपचा पुन्हा हल्लाबोल, नवी मुंबईतला वाद पेटला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com