Maharashtra Live News Update : वीज कर्मचाऱ्यांचा ७२ तासांसाठी राज्यव्यापी संपावर जाण्याचा निर्णय

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्रावर शक्ती चक्रवादळाचं संकट, कोकण मराठवाड्यात पावसाची शक्यता, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Pune : दोन दिवस पुणे पोलिसांची निलेश घायवळाच्या पुण्यातील घरांवर छापेमारी

छापीमारीमध्ये घायवळच्या कोथरूडमधील घरात सापडल्या बंदुकीच्या गोळ्या.

त्याचबरोबर सातबारे, साठेखत आणि विविध जमिनींची संदर्भात कागदपत्र सापडली

याशिवाय मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातील फाइल्स पोलिसांनी केल्या जप्त

याशिवाय पुणे पोलिसांचे महानगरपालिकेला पत्र.. निलेश घायवळच्या नावावर अनधिकृत बांधकामे तसेच मालमत्ताची चौकशी होणार... पुणे महानगरपालिका अनधिकृत मालमत्तेवर कारवाई करण्याच्या तयारीत

पुणे महापालिकेचे पथक घायवळच्या अनधिकृत मालमत्ता तसेच थकीत कर असलेल्या मालमत्ता सिझ करणार

पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती फार्स आवळला

पुणे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात चांगला पाऊस

यंदाचा पावसाळी हिंदू मत पुणे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला विशेषता मावळ तालुक्यात सर्वाधिक सरासरीपेक्षा दुप्पट झाला असून मुळशी भोर खेड आंबेगाव शिरूर आणि दौंड तालुक्यातही सरासरीपेक्षा पाच ते पंधरा टक्के अधिक पावसाची नोंद झाली.

त्यामुळे पाण्याची चिंता मिटली असली तरी सप्टेंबर अखेर झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेय.

यूपीएससी पूर्वपरीक्षेची तात्काळ उत्तर तालिका

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरिक सेवा पूर्व परीक्षेच्या उत्तर तालिका अर्थात अन्सर कीज आता परीक्षानंतर तात्काळ जाहीर केल्या जाणार आहेत या महत्वपूर्ण निर्णय याची माहिती आयोगाने सर्वोच्च न्यायालयात एका प्रतिज्ञापत्र द्वारे दिली आहे.

परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याचा मागणीसाठी दाखवलेल्या याचे केवळ सुनावणी दरम्यान यूपीएससी ही भूमिका स्पष्ट केली आहे.

अतिवृष्टीने केळी बाग झाली आडवी, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा आश्रू

धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विश्वरूपा नदीला आलेल्या महापुरामुळे भांडगाव येथील प्रगत शेतकऱ्यांची केळीच्या बाग अक्षरशः उद्ध्वस्त झाली असून,शेतकऱ्यांच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.जिल्ह्यात झालेल्या धुवाधार पावसामुळे वादळी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. भांडगाव मधील विजय चाबुकस्वार गुरव या शेतकऱ्याची आठ लाख रुपये खर्चून लावलेली केळीची भाग अक्षरश:भुई सपाट झाली.विश्वरूपा नदी दोन वेळा पात्रा बाहेर गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या केळी आणि बागा पूर्णपणे उध्वस्त झाल्या.आगामी सणासुदीत या पिकावरून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती,परंतु आता शेतकरी डोळ्यांदेखत त्यांची मेहनत पाण्यात बुडाली आहे .

भंडारा शहरातील गांधी चौकात तिरुपती एम्पोरीयम येथे लागली भीषण आग.

भंडारा शहरातील गांधी चौकात असलेल्या तिरुपती गिफ्ट एम्पोरीयम येथे रात्री भिषण आग लागल्याने या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाली आहे,आग लागण्याचा कारण अद्याप अस्पष्ट असले तरी शॉर्ट सर्किट ने आग लागल्याचा बोलले जात आहे,आगीची माहिती मिळताच नागरिकांनी अग्निशमक दलाला माहिती दिली, अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळाले असले तरी दुकानाचा संपूर्ण सामान जळून खाक झालं.

Maharashtra Live News Update :  ९ ऑक्टोबरपासून वीज कर्मचाऱ्यांचा ७२ तासांसाठी राज्यव्यापी संपावर जाण्याचा निर्णय

नांदेडमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्या नुसार नांदेड मध्ये मुसळधार पाऊस सुरु.

मध्ये रात्री पासून नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसाची तुफान बॅटिंग.

नांदेड शहरातील रस्ते जलमय, रस्त्याला आले नदीचे स्वरूप.

तीन दिवस घेतली होती पावसाने विश्रांती.

पुन्हा परतीच्या पावसाने नांदेडला झोडपले.

नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी.

ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समाजस्नेह पुरस्कार

ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्ताने देण्यात येणारा ‘समाजस्नेह पुरस्कार’ एकनाथ शिंदे यांना जाहीर

कर्नाटकातील श्री माणिकप्रभू संस्थानचे पीठाधीश ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

पुण्यातील टिळक स्मारक मंदिर याठिकाणी १२ ऑक्टोबर रोजी हा पुरस्कार सोहळा

पुरस्कारासोबतच समाजभूषण, युवा गौरव पुरस्काराचे वितरण देखील याप्रसंगी होणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनाची तयारी जोरात 50 हजार लोक बसण्याची व्यवस्था

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर रोजी होत आहेत डिसेंबर मध्ये विमान सेवा सुरू होणार आहेत दोन रनवे असणार आहेत

या कार्यक्रमासाठी पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ उपस्थित असणारे त्यामुळे कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू झाली आहे

nashik-laslgon-कांदा व्यापाऱ्याला चाकूने भोसकले

नाशिकच्या लासलगाव जवळील विंचूर येथील मारवाडी पेठेत कांदा व्यापारी पावन जाजू यांच्यावर त्यांचा सहकारी बोराडे नावाच्या व्यक्तीने चाकू ने हल्ला केल्याची घटना घडली असून,पावन जाजू यांच्या पोटावर जबरदस्त वार झाले आहे,घरासमोर उभे असताना हल्लेखोराने त्यांच्यावर वार केले,घटना घडतात आजू-बाजूच्या लोक धावत आले आणि त्यांनी जाजू यांना हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले मात्र घाव जबरी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले असून,लासलगाव पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहे

भिवंडीमध्ये अग्नितांडव

भिवंडी तालुक्यातील लोनाड ग्रामपंचायत हद्दीतील पॅरामाउंट वेअर हाऊस संकुलातील कुरिअर गोडाऊनला भीषण आग.

शाडो फॅक्स, बर्ड व्हिव, कुरिअर गोडाऊन आगीच्या भक्ष्य स्थानी शॉर्ट सर्किट मुले आग लागण्याचा प्राथमिक अंदाज.

घटनास्थळी भिवंडी महानगरपालिकेची आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल, आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू.

शेतकऱ्यांना देणार प्रति टन 3020 रुपये उसाला भाव.....

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 28 वा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन कारखान्याचे अध्यक्ष माजी खासदार नानासाहेब नवले आणि देहू देवस्थानचे मुख्य विश्वस्त जालिंदर महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी परिसरातील शेतकरी बांधव, हितचिंतक आणि कारखान्याचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यंदा कारखान्याकडून तब्बल पाच लाख टन ऊस गाळपाचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, गेल्या वर्षी सुमारे चार लाख टन उसाचे गाळप करण्यात आले होते. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ऊसदरातही वाढ करण्यात आली असून, गेल्या वर्षी प्रति टन 2900 रुपये भाव देण्यात आला होता, तर यंदा 3020 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

राजगुरूनमध्ये तरुणाच्या डोक्यात दगड टाकत बेदम मारहाण

राजगुरुनगर शहरातील वृदावन सोसायटी रोड गुन्हेगारी टोळीकडुन तरुणाच्या डोक्यात दगड टाकत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. रात्रीच्या वेळी तीन दुचाकीवर आलेल्या सहा तरुणांनी तरुणावर हाताने दगडाने बेदम मारहाण करत उच्चभ्रु सोसायटीत जिवे मारण्याचा प्रयत्न करत दहशत निर्माण केली या मारहाणीचा विडिओ समोर आलाय लहान वयातील तरुणपिढी गुन्हेगारी वृत्तीकडे वळण घेत असल्याचे या विडिओतुन समोर आल्याने पोलीसांची गुन्हेगारी वचक राहिला नाही का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

भंडारा शहरातील मिस्कीन टॅंक गार्डनचा तलाव फुटला

भंडारा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मिस्कीन टॅंक येथील नगरपालिका प्रशासनाचा तलाव मुसळधार पाऊस पडल्यानंतर सायंकाळी फुटला तलावाच्या पाण्याचा प्रवाह भंडारा शहराचा मुख्य मार्ग असलेला जे एम पटेल मार्गावरून वाहत असल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हे तलावाचं पाणी खालच्या भागांमध्ये असलेल्या बैरागी वाडा, बजाज कॉम्प्लेक्स, गांधी विद्यालय, तहसील कार्यालय परिसरात पूर्णपणे जलमयस्थिती निर्माण झाली आहे.

Maharashtra Live News Update : आदिवासी समाजाचा नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा अशी मागणी बंजारा समाजाने लावून धरली आहे.एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज मोठ्या प्रमाणात मोर्चे देखील काढत आहे.बंजारा समाजाच्या मागणीला आदिवासी समाज देखील आता मोर्चे काढून प्रखरपणे विरोध करीत आहे. बंजारा समाजाच्या मागणीच्या विरोधात आज नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा उलगुलान आरक्षण बचाव महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी 11 वाजता नांदेड शहरातील नवीन मोंढा बाजार समितीच्या मैदानातून हा मोर्चा निघणार आहे. नवीन मोंढा, अण्णाभाऊ साठे चौक, चिखलवाडी कॉर्नर मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.बंजारा समाजाने काढलेल्या मोर्चा पेक्षा दीडपट मोठा मोर्चा आमचा असेल असा दावा आमदार भीमराव केराम यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com