Shocking: एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह तलावात आढळले, आई अन् ४ मुलांसोबत भयंकर घडलं

Bihar News: बिहारमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह तलावात आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. त्याची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली याचा तपास पोलिस करत आहेत.
Shocking: एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह तलावात आढळले, आई अन् ४ मुलांसोबत भयंकर घडलं
Bihar Shocking news Saam Tv
Published On
  • बिहारमध्ये आईसह चार मुलांचे मृतदेह तलावात आढळले

  • एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूचं कारण काय

  • कौटुंबीक वादातून घटना घडल्याचा अंदाज

  • आईसह चार मुलांच्या मृत्यूमागचं कारण पोलिस शोधत आहेत

बिहारमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह तलावात आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. बिहारच्या पूर्वी चंपारण जिल्ह्यातील अरेराज येथे ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी पाच जणांचे मृतदेह तलावात तरंगताना पाहून स्थानिकांना हादरा बसला. आईसह दोन मुलं आणि दोन मुलींचा मृतांमध्ये समावेश आहे. हे सर्वजण बभनौली येथे राहणारे होते आणि गुरूवारी संध्याकाळपासून ते गायब झाले होते. या घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाचही जणांचे मृतदेह तलावातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या पाचही जणांसोबत घातपात झाला की त्यांनी आत्महत्या केली? याचा तपास पोलिस करत आहेत. सुशीला देवी (३५ वर्षे), अमृता कुमारी (११ वर्षे), अविनाश कुमार (८ वर्षे), पम्मी कुमारी (६ वर्षे), रवी कुमार (४ वर्षे) अशी मृतांची नावं आहेत.

Shocking: एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह तलावात आढळले, आई अन् ४ मुलांसोबत भयंकर घडलं
Crime: १७ वर्षीय मुलीवर बॉयफ्रेंडकडून बलात्कार, बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या; अमरावती हादरले

सुशीला देवी गुरुवारी संध्याकाळी आपल्या चार मुलांसह घरातून बेपत्ता झाल्या. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. पण त्यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही. शुक्रवारी सकाळी गावकऱ्यांना एका तलावात पाच जणांचे मृतदेह तरंगताना आढळले आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

Shocking: एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह तलावात आढळले, आई अन् ४ मुलांसोबत भयंकर घडलं
Nandurbar Crime: अल्पवयीन मुलांसह तरुणांवर लैंगिक अत्याचार, मोबाइलमध्ये २०० हून अधिक अश्लिल व्हिडीओ सापडले; नंदुरबार हादरले

महिलेच्या नवऱ्याने सांगितले की, सुशीला गवत कापायला गेली होती आणि मुले तिच्यासोबत होती. त्याचवेळी ते तलावात बुडून मरण पावले. पण पाचही जणांचा एकाच वेळी तलावात बुडून मृत्यू होणे संशयास्पद वाटते. पण त्यांच्या कुटुंबात कौटुंबिक वाद सुरू होता अशी चर्चा गावात सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com