सोलापुरातील शांतिनगर परिसरात तरुणाचा मृतदेह आढळला
प्राथमिक माहितीनुसार धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या
तरुणाचा काही महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता आणि ३-४ महिन्यांत त्याचे लग्न होणार होते
पुढील पोलीस तपास सुरु केला आहे
विश्वभूषण लिमये, सोलापूर
घरात लग्नाची घाईगडबड सुरू होती,अवघ्या दोन-तीन महिन्यांवर लग्न आल्याने कुटुंबीय साखरेसारख्या गोड स्वप्नांमध्ये रंगले होते.काही महिन्यांपूर्वीच हातात बसलेली साखरपुड्याची अंगठी त्याच्या नव्या आयुष्याची नांदी सांगत होती.मात्र, नियतीच्या आणि गुन्हेगारांच्या मनात भलताच डाव होता.गुरुवारी भल्या पहाटे एका फोनने बिराजदार कुटुंबाच्या या आनंदावर कायमचा नांगर फिरवला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नई जिंदगी पोलीस चौकीपासून अवघ्या काही पावलांच्या अंतरावर असलेल्या शांतीनगर परिसरातील पाण्याच्या टाकीखाली गुरुवारी सकाळी 9 च्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळला.उमर मौलाली बिराजदार (वय 22 रा. सिद्धेश्वर गांधी नगर, मठाजवळ, सोलापूर) असे या दुर्दैवी मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ९ ते ९:३० च्या सुमारास शांतीनगर भागातील पाण्याच्या टाकीजवळ एक तरुण बेशुद्धावस्थेत पडला होता आणि जवळच त्याची दुचाकी कोसळलेल्या स्थितीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तरुणाची पाहणी केली असता त्याच्यावर अज्ञात हल्खोरांनी धारदार शस्त्राने वार करून खून झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
दरम्यान, उमर याचा अवघ्या काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा झाला होता आणि अवघ्या 3-4 महिन्यांतच त्याचे लग्न होणार होते.घरात लग्नाची खरेदी आणि तयारी सुरू असतानाच उमरचा असा दुर्दैवी अंत झाल्याने बिराजदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलीस चौकीच्या इतक्या जवळ हा प्रकार घडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा खून जुन्या भांडणातून झाला की यामागे भलतेच काही कारण आहे? याचा शोध पोलीस घेत असून गुन्हे शाखेकडून विशेष पथके तैनात करण्यातआहे.तर परिसरातील सीटीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी वेगाने सुरू केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.