Crime: १७ वर्षीय मुलीवर बॉयफ्रेंडकडून बलात्कार, बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या; अमरावती हादरले

Amravati Crime: अमरावतीमध्ये १७ वर्षीय मुलीवर बॉयफ्रेंडने बलात्कार केला. या घटनेनंतर मानसिक धक्का बसलेल्या मुलीने आत्महत्या केली.
Crime: १७ वर्षीय मुलीवर बॉयफ्रेंडकडून बलात्कार, बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या; अमरावती हादरले
Amravati CrimeSaam Tv
Published On
  • अमरावतीमध्ये १७ वर्षीय मुलीवर बलात्कार

  • बॉयफ्रेंडने मुलीवर जबरदस्ती केली

  • मानसिक धक्का बसलेल्या मुलीची आत्महत्या

  • वडिलांची बदनामी होईल या भीतीने उचललं टोकाचं पाऊल

अमर घटारे, अमरावती

अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या मुलीने वडिलांची इज्जत जाऊ नये यासाठी टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवलं. विष प्राशन करून तिने आत्महत्या केली. अमरावती जिल्ह्यात वरुड तालुक्यात ही घटना घडली. या घटनेमुळे अमरावती जिल्हा हादरला. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्या केलेल्या मुलीचा प्रियकर, त्याचा मित्र आणि तिच्या दोन मैत्रिणींविरोधात गुन्हा दाखल केा. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या शेंदुरना घाट पोलीस स्टेशन हद्दीतील धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने सुसाइड नोट लिहिली होती. प्रियकराने बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला होता याचा तिला मोठा मानसिक धक्का बसला होता. याच मानसिक धक्क्यातून तिने आत्महत्येसारखा टोकाचे पाऊल उचललं. हा प्रकार समाजात माहीत झाला तर वडिलांची इज्जत जाईल याच भीतीने तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. मी माझ्या वडिलांवर कोणताही ताण आणू शकत नाही असे सुसाइड नोटमध्ये लिहित तिने आयु्ष्य संपवलं.

Crime: १७ वर्षीय मुलीवर बॉयफ्रेंडकडून बलात्कार, बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या; अमरावती हादरले
Delhi Crime: दिल्ली हादरली! १० वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, मृतदेह जंगलात नेऊन फेकला

'मी माझ्या वडिलांवर कोणताही ताण आणू शकत नाही...' असं लिहित १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. या प्रकरणाने अमरावतीत मोठी खळबळ उडाली आहे. पीडित मुलीचे १७ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते. प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. यामध्ये त्याच्या मैत्रिणींनीही त्याला साथ दिल्याचे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर समाजात बदनामी होईल, तसेच आपल्या वडिलांवर मानसिक ताण येईल या भीतीने मुलीने विष प्राशन केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Crime: १७ वर्षीय मुलीवर बॉयफ्रेंडकडून बलात्कार, बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या; अमरावती हादरले
Crime: ५० वर्षीय महिलेवर बलात्कार; तरुणाने पार्कमध्ये खेचत नेत केलं भयंकर कृत्य, नंतर...

मृत्यूपूर्वी मुलीने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये ज्यांची नावं लिहिली होती त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील शेंदुरजनाघाट पोलिसांनी मुलीचा १७ वर्षीय प्रियकर, त्याच्या दोन मैत्रिणी आणि मित्र यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Crime: १७ वर्षीय मुलीवर बॉयफ्रेंडकडून बलात्कार, बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या; अमरावती हादरले
Crime News: १२ वर्षांच्या मुलीची बलात्कार करुन हत्या करणाऱ्या आरोपीचं एन्काऊंटर

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये पीडितेने आपल्या आयुष्यातील घडामोडींचा उल्लेख केला आहे. १० महिन्यांपासून मुलीसोबत संबंध होते. त्याने लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवले. तसेच त्याच्या दोन मैत्रिणींनीही त्याला साथ दिल्याचा आरोप तिने केला आहे. समाजात बदनामी होईल आणि आपल्या वडिलांना अपमान सहन करावा लागेल, या भीतीने आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचेही तिने चिठ्ठीत नमूद केले आहे.

Crime: १७ वर्षीय मुलीवर बॉयफ्रेंडकडून बलात्कार, बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या; अमरावती हादरले
Crime: १३ वर्षीय भाचीचं अपरहण, शेतात नेऊन मामाकडून बलात्कार; नंतर गळा दाबून संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com