Bihar News: तीन मुलं असल्याने गेली महापौरांची खुर्ची, निवडणूक लढण्यापूर्वी जाणून घ्या नियम

Bihar Chapra Mayor Rakhi Gupta: तीन मुलं असल्याने गेली महापौरांची खुर्ची, निवडणूक लढण्यापूर्वी जाणून घ्या नियम
Bihar Chapra Mayor Rakhi Gupta
Bihar Chapra Mayor Rakhi GuptaSaam Tv
Published On

Bihar Chapra Mayor Rakhi Gupta: बिहारची राखी गुप्ता सध्या चर्चेत आहे. त्या छपरा महापालिकेच्या महापौर होत्या. मात्र तीन मुलांची आई असल्याने त्यांची खुर्ची गेली. त्यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात फक्त दोन मुलांचा उल्लेख केला होता आणि एका मुलाबद्दल माहिती दिली नव्हती.

त्यांच्या प्रतिज्ञापत्राला आव्हान देत निवडणूक आयोगात खटला दाखल करण्यात आला होता. यानंतर आयोगाने त्यांना महापौरपदासाठी अपात्र ठरवले. नेमकं काय आहे आहे हे प्रकरण? कोणत्या नियमामुळे राखी गुप्ता यांची खुर्ची गेली? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...

Bihar Chapra Mayor Rakhi Gupta
Delhi Crime News: दिल्ली पुन्हा हादरली! लग्नाला नकार दिल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, कॉलेजच्या बाहेर तरुणीसोबत केलं भयंकर कृत्य

राखी या छपरा महापालिकेच्या महापौर होत्या

राखी यांचं म्हणणं आहे की, त्यांनी तिसरे मूल दत्तक घेण्यासाठी एका निपुत्रिक नातेवाईकाला लेखी दिले होते. अशा परिस्थितीत त्यांना कायदेशीररित्या दोनच मुले आहेत. पण राज्य निवडणूक आयोगाने नियमाचा हवाला देत राखी यांचे महापौरपदाचे सदस्यत्व रद्द केले.

असा कोणता नियम आहे ज्यामुळे महापौरांची खुर्ची गेली?

बिहार नगरपालिका अधिनियम 2007 च्या कलम 18 (1) (एम) नुसार, 4 एप्रिल 2008 नंतर एखाद्या नागरिकाला तिसरे अपत्य असल्यास तो महापालिका निवडणुकीत निवडणूक लढवू शकत नाही. दोनपेक्षा जास्त अपत्ये असलेल्या व्यक्तींनी जरी एखादे मूल दत्तक दिले, तरी ते त्या बालकाचे जैविक पालक मानले जातील, असेही या कायद्यात स्पष्ट करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Bihar Chapra Mayor Rakhi Gupta
Modak Sagar Lake Overflows: मुंबईकरांसाठी खुशखबर! मोडक-सागर तलाव ओसंडून वाहू लागलं...

या निर्णयाविरोधात राखी गुप्ता याची उच्च न्यायालयात धाव

महापालिका अधिनियम 2007 च्या या नियमांतर्गत छपरा महापालिकेच्या माजी महापौर सुनीता देवी यांनी राखी गुप्ताविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. पाच महिन्यांच्या सुनावणीनंतर गुरुवारी या प्रकरणात निर्णय आला आणि अखेर राखी यांना सदस्यत्व गमवावे लागले. मात्र, या निर्णयाविरोधात राखी यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com