

विधानसभा निवडणुकीदरम्यान आरजेडीने आपल्या उमेदवाराला पक्षातून काढलं.
मोहम्मद अफजल अली खान यांच्यावर कारवाई
पक्षाने मोहम्मद अफजल अली खान यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलंय.
बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान रोमांचकारी आणि चक्रावून टाकणाऱ्या घटना घडत आहेत. त्याच झालं असं बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय जनता दलाने (RJD) आपल्याच पक्षाच्या नेत्यावर मोठी कारवाई केलीय. पक्षाने त्यांचे नेते मोहम्मद अफजल अली खान यांना तब्बल सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकलंय.
दरभंगा जिल्ह्यातील गौरवाभौरम विधानसभा जागा अखिल भारतीय आघाडी अंतर्गत विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) ला देण्यात आली. याबाबत पक्षश्रेष्ठींनी सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.मात्र या सूचनेनंतरही अफजल अली खान यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यांच्यावर कारवाई करत पक्षाने त्यांना पक्षातून काढून टाकलंय.
दरम्यान मोहम्मद अफजल अली खान यांना निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडून चिन्ह देण्यात आलं होतं. मात्र आता परिस्थिती बदलेली आहे. आता पक्षाकडून त्यांना निवडणूक न लढण्यास सांगितलंय. इतकेच नाहीतर पक्षाने त्यांना पक्षातून ६ वर्षांपासून निलंबित देखील केलंय.
पक्षाने याबाबत एक पत्र जाहीर केलंय. परस्पर समन्वयाच्या आधारे, इंडिया अलायन्सने दरभंगा जिल्ह्यातील ७९, गौरवौरम विधानसभा जागा विकासशील इंसान पक्षाला देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या जागेवर इंडिया आघाडीचे उमेदवार संतोष सहनी यांना निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आलीय. पत्रात असे म्हटले की, राष्ट्रपती लालू प्रसाद यांनी घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मोहम्मद अफजल अली खान यांनीही युती धर्माचे पालन करत पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा आदर करणे अपेक्षित होतं.
मात्र त्यांनी एनडीए आघाडीला फायदा व्हावा म्हणून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यानंतर त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आलंय. दरम्यान जागावाटप होण्याआधी राष्ट्रीय जनता दलाने मोहम्मद अफजल अली यांना गौडा बौराममधून पक्षाचं चिन्ह देण्यात आलं होतं. त्यांना निवडणूक लढवण्यास संधी दिली. इतकेच नाही तर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. परंतु ही जागा व्हीआयपीला सुटली त्यामुळे अफजल अली यांना त्यांचा उमेदवारी अर्ज घेण्यास सांगणयात आले. पंरतु त्यांनी उमेदवारी मागे घेतली नाही, त्यामुळे त्यांच्यावर करावाई करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.