Uttarkashi Tunnel Rescue: ९ दिवसांनंतर मोठी बातमी, बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना ६ इंच पाईप देणार जीवनदान

Uttarkashi Tunnel: बोगद्यात अडकलेले मजूर फक्त मुरमुरे, उकडलेले व भाजलेले हरभरे आणि सुका मेवा खात होते.
Uttarkashi Tunnel
Uttarkashi Tunnelyandex

Uttarkashi Tunnel Rescue:

उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेत बचावकार्य सुरू असून रेस्क्यू टीमला ९ दिवसांत पहिली खूशखबर मिळालीय. ६ इंची पाईप ४१ मजुरांना जीवनाचा आधार आणि खाद्यपदार्थ पुरवण्यात येणार आहे. हा पाईप टाकला जात होता तेव्हा, हा पाईप दगडातून जाऊ न शकल्यानं अडकला होता. आता या पाईपने ५७ मीटरचा टप्पा ओलांडलाय. आता या पाईपच्या मदतीने सामान्य अन्न म्हणजे ब्रेड, भाजीपाला आणि वैद्यकीय वस्तू कामगारांना उपलब्ध केले जाणार आहेत. (Latest News)

याआधी बोगद्यात अडकलेले मजूर फक्त मुरमुरे, उकडलेले व भाजलेले हरभरे आणि सुका मेवा खात होते. दरम्यान आज उत्तरकाशी बोगदा बचाव NHIDCLनं आज आनंदाची बातमी दिलीय. त्यांच्या अथक परिश्रम करून आज चांगली बातमी दिली. NHIDCL संचालक अंशू मनीष यांनी त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. बचाव मोहिमेबद्दल त्यांनी सांगितले की, डीआरडीओने २० किलो आणि ५० किलो वजनाचे दोन रोबोट पाठवलेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हे रोबोट्स जमिनीवर चालतात परंतु बोगद्यातील माती वाळूसारखी सरकत आहे. यामुळे हे रोबोट्स तिथे चालू शकतील की नाही याबद्दल शंका आहे. दरम्यान या रोबोटची बचाव मोहिनेत मदत होईल का नाही याची खात्री नसल्याचंही ते म्हणाले.

बोगद्यात अडकलेल्या मजुरांना अन्न आणि औषधं पुरवली जात आहेत. बचाव टीम मजुरांशी नियमित संपर्क करत आहेत. मजुरांचा उत्साह कमी होऊ नये, तसेच त्यांनी संघर्ष करण्याची जिद्द सोडून नये, यासाठी त्यांना प्रोत्साहित करत आहेत. अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी थायलंड आणि नॉर्वे येथील विशेष बचाव पथकांना बोलवण्यात आली आहेत. या दोन्ही बचाव पथकाने २०१८ मध्ये थायलंडमधील गुहेत अडकलेल्या मुलांची यशस्वीरित्या सुटका केली होती.

वेगवेगळ्या एजन्सींवर जबाबदारी

परिवहन आणि महामार्ग मंडळाचे सचिव म्हणाले, “पाच पर्याय निश्चित करण्यात आले आहेत. ते पूर्ण करण्यासाठी ५ वेगवेगळ्या एजन्सींना जबाबदारी देण्यात आलीय. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC), सतलुज हायड्रोपॉवर कॉर्पोरेशन (SJVNL), रेल विकास निगम लिमिटेड (RVNL), राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL), आणि टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (THDCL) या पाच संस्थांना जबाबदारी सोपवण्यात आलीय.

काय आहेत ५ पर्याय

  • बोगद्यात अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यासाठी सतलज जल विद्युत निगमकडून बोगद्याच्या वरून उभ्या खोदकाम केलं जात आहे.

  • बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने एका दिवसात एक अप्रोच रोड पूर्ण केलं. त्यानंतर रेल्वे विकास निगमने अत्यावश्यक पुरवठ्यासाठी दुसर्‍या उभ्या पाइपलाइनचे काम सुरू केलं.

  • त्यानंतर डीप ड्रिलिंगमध्ये एक्सपर्ट असलेल्या ओएनजीसीने दुसऱ्या टोकापासून व्हर्टिकल ड्रिलिंगचे काम सुरू केलंय.

  • राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास संस्थेकडून सुरक्षा व्यवस्थेवर काम झाल्यानंतर मुख्य सिल्क्यरा टोकापासून ड्रिलिंग सुरू करत राहील.

  • हे सुलभ करण्यासाठी लष्कराने बॉक्स कल्व्हर्ट तयार केलाय. मजुरांचं संरक्षण होण्यासाठी केनोपी बनवलं जात आहे.

  • टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सूक्ष्म बोगद्यावर काम करेल. यासाठी अवजड यंत्रसामग्री जमा केली आहेत.

Uttarkashi Tunnel
Uttarakhand Breaking News: उत्तराखंडमध्ये भूस्खलन, ४० कामगार अडकले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com