Pune News: पुण्याजवळ वाहतुकीचा वेग मंदावला; वरंधा घाट अवजड वाहनांसाठी बंद, तर कात्रज बोगदा-नवले पुलादरम्यान वेगमर्यादा निश्चित

Pune Traffic News: पुण्याजवळ वाहतुकीचा वेग मंदावला; वरंधा घाट अवजड वाहनांसाठी बंद, तर कात्रज बोगदा-नवले पुलादरम्यान वेगमर्यादा निश्चित
Pune Latest News
Pune Latest NewsSaam Tv
Published On

Pune Latest News: सध्या राज्यभरात मान्सून सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळणे आणि झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच पाऊसातिल दोन महत्वाच्या मार्गांवर अवजड वाहनांची वाहतुक बंद करण्यात आली आहे. तर एका मार्गावर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

वरंधा घाट रस्ता अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद

जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर, भोर, महाड राष्ट्रीय महामार्गवरील वरंधा घाट रस्ता २२ जुलै ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत अवजड वाहतुकीकरीता संपूर्णपणे राहणार बंद करण्यात आला आहे.

Pune Latest News
INDIAची पुढील बैठक मुंबईत कुठे आणि कधी होणार; महत्त्वाची माहिती आली समोर

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात. संभाव्य जीवित व वित्त हानी टाळण्याच्या उद्देशाने हा घाट रस्ता अवजड वाहनांसाठी पावसाळा कालावधीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)

कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान जड वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित

दुरीकडे पुण्यातील कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान जड वाहनांसाठी ४० किमी प्रतितास वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. नवले पुलावर होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वेगमर्यादा निश्चित केल्याचे आदेश पुणे शहर वाहतूक शाखेकडून जारी केले आहेत.

Pune Latest News
Warning Signs Of Landslide : दरड कोसळण्यापूर्वी काय संकेत मिळतात? आजूबाजूच्या छोट्या बदलांमधून ओळखता येईल मोठा धोका

नागरिकांच्या सूचना व हरकतींवर विचार करुन हे आदेश जारी

टॅक्टर, ट्रेलर कॉम्बीनेशन, ट्रक- ट्रेलर, अर्टीक्युलेटेड व्हेइकल्स, मल्टी ॲक्सल वाहने, कंटेनर, मोठ्या आकाराच्या मालाची वाहतूक करणारी वाहने आदी जड, अवजड वाहनांसाठी ही वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com