Warning Signs Of Landslide : दरड कोसळण्यापूर्वी काय संकेत मिळतात? आजूबाजूच्या छोट्या बदलांमधून ओळखता येईल मोठा धोका

Warning Signs Of Landslide (In Marathi) : अशा घटनांपासून सावध राहण्यासाठी संभाव्य धोका कसा ओळखायचा याबाबत भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. सतीश ठिगळे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
Irshalgad Landslide News
Irshalgad Landslide NewsSigns of landslide
Published On

अक्षय बडवे

Raigad Irshalgad Landslide :

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेनंतर अवघा महाराष्ट्र आणि देश दु:खात आहे. मात्र इर्शाळवाडीची दरड कोसळ्याण्याची घटना काही नवीन नाही. या आधीही माळीण आणि तळीये येथे नैसर्गिक संकटात मोठी जीवितहानी झाली होती. मात्र या घटनामधून आपण काय शिकलो हे विचारण्याची वेळ आता आपल्यावर आणि प्रशासनावर आली आहे.

कारण दरड कोसळण्याच्या अशा घटनानंतर त्याच्या कारणांची चर्चा तर होते, अशा घटनांपासून बचाव करण्यासाठी उपयायोजनांची नक्कीच गरज आहे. मात्र या घटनांपासून सावध राहण्यासाठी संभाव्य धोका कसा ओळखायचा याबाबत भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. सतीश ठिगळे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.

दरड कोसळण्यापूर्वी संकेत काय मिळतात?

सर्व साधारणपणे डोंगर उतार यांना तडे जातात. डोंगर उतार खचू लागतात. पाण्याचे झरे आटतात किंवा क्षमता कमी होते. परिसरातील घरांना तडे जातात. तसेच जमिनीतून ओल येते, असं डॉ. ठिगळे यांनी सांगितलं. (Maharashtra News)

Irshalgad Landslide News
Why landSlide Increase in Sahyadri : सह्याद्री का खचतोय? इर्शाळवाडी दुर्घटना भविष्यातीत मोठ्या धोक्याचा इशारा, Explained

दरड का कोसळते?

दरड कोसळण्याची दोन कारणे महत्त्वाची आहेत. एकतर नैसर्गिक आणि दुसरे म्हणजे मानवनिर्मित. अतिदुर्गम परिसर/डोंगराने व्यापलेल्या भागात पावसाचे प्रमाण जास्त असते. खडकांची रचना वेगळी असते. भूकंपप्रवण क्षेत्र असते. त्यामुळे याठिकाणी झाडे तोडणे किंवा निसर्गाच्या विरुद्धाच्या गोष्टी केल्या तर असे नैसर्गिक संकटे येण्यचा धोका असतो, असंही डॉ. ठिगळे म्हणाले.

Irshalgad Landslide News
Irshalgad Landslide News : आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ सगळे दरडीखाली अडकले, आश्रमशाळेत असलेल्या मुलीचे भयावह दृष्य पाहून अश्रू थांबेना

दुर्घटनेनंतरच यंत्रणांना जाग येते?

रायगड जिल्ह्यात मान्सून पूर्व तयारीच्या संदर्भाने बरचं काम झालेलं आहे. असं सांगितलं जात आहे की संभाव्य यादीत या भागाचा समावेश नव्हता. मात्र माझ्या मते लोकांना लक्षण दिसली नसतील किंवा त्यांना जाणवले नसेल म्हणून त्यांनी शासनाकडे हे कळवले नाही. त्या भागात शेकडो वाड्यावस्त्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, असंही डॉ. ठिगळे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com