INDIAची पुढील बैठक मुंबईत कुठे आणि कधी होणार; महत्त्वाची माहिती आली समोर

INDIA Alliance News Update: INDIAची पुढील बैठक मुंबईत कुठे आणि कधी होणार; महत्त्वाची माहिती आली समोर
 INDIA Alliance News Update
INDIA Alliance News UpdateSaam Tv
Published On

INDIA Alliance News Update: वर्ष 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्ष नेत्यांनी भाजप विरुद्ध एकत्र येण्याच्या निर्णय घेतला आहे. यातच आता 26 विरोधी पक्षांनी एकत्र येत "इंडियन नेशनल डेमोक्रेटिक इंक्लूसिव एलायंस"ची (indian National Democratic Inclusive Alliance) स्थापना केली आहे.

बंगळुरूमध्ये झालेल्या बैठकीत विरोधी पक्ष नेत्यांनी या नावाची घोषणा केली आहे. मराठीमध्ये याचा अर्थ भारतीय राष्ट्रीय लोकशाहीवादी सर्वसमावेशक आघाडी, असा आहे.

 INDIA Alliance News Update
Raigad Khalapur Irshalgad Landslide News: भविष्यात इर्शाळवाडीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार: उपमुख्यमंत्री अजित पवार

यातच आता इंडियाच्या पुढील बैठकी संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. बंगळुरूमध्ये झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांची बैठक मुंबईत होणार असं सांगितलं होत. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडीआयची तिसरी बैठक ही मुंबईत ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकते. (Latest Marathi News)

मुंबईत कुठे होऊ शकते बैठक?

इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत 25 ऑगस्ट नंतरहोऊ शकते. ही बैठक ग्रँड हयात या हॉटेलमध्ये होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ही बैठक मुंबईत होत असल्यामुळं शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्यांकडे नियोजनाची जबाबदारी असू शकते. सोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही नियोजनात सहभागी होऊ शकतात.

 INDIA Alliance News Update
Warning Signs Of Landslide : दरड कोसळण्यापूर्वी काय संकेत मिळतात? आजूबाजूच्या छोट्या बदलांमधून ओळखता येईल मोठा धोका

दरम्यान, विरोधी पक्षांची बिहारच्या (Bihar) पटनामध्ये पहिली बैठक झाली होती. यानंतर बंगळुरूमध्ये (Bengluru) विदुसरी बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com