Snake Eaten Plastic Bag: बापरे! प्लास्टिक पिशवी गिळल्यानंतर सापाची तडफड, रेस्क्यू ऑपरेशनचा VIDEO व्हायरल

Snake Rescue In Pimpri Chinchwad: पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका सापाने प्लास्टिक पिशवी गिळली होती. सर्पमित्रांच्या मदतीने सापाला जीवनदान देण्यात आलं आहे.
Snake Eaten Plastic Bag
Snake Eaten Plastic BagSaam TV
Published On

गोपाल मोटघरे, पिंपरी चिंचवड

Snake Video:

तुम्ही आत्तापर्यंत भटक्या गाईंनी प्लास्टिक गिळलेलं ऐकलं असेल. प्लास्टिक गिळतानाचे काही व्हिडीओ देखील पाहिले असतील. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये चक्क एका सापाने प्लास्टिकची पिशवी गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Snake Eaten Plastic Bag
Hyderabad Crime News: खळबळजनक! ४ वर्षाच्या चिमुकलीसह दाम्पत्याने संपवलं जीवन, मन सून्न करणारी घटना!

सापाने प्लास्टिक पिशवी का गिळली असावी? साप प्लास्टिक खातो का? सापांना प्लास्टिक पचतं का? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उभे राहिले आहेत.

साप प्लास्टिक गिळत असतानाचा व्हिडीओ पाहून कुणालाही वाटेल की या सापाने कोंबडीचे अंड गिळले असेल. मात्र व्हिडीओ निट पाहिल्यावर समजते की, या सापाने चक्क प्लास्टिकची पिशवी गिळली आहे.

सापाने प्लास्टिक गिळल्याची बहुतेक ही पहिलीच घटना आसावी, पण धामण जातीच्या या मांसाहारी सापाने प्लास्टिक पिशवी का गिळली हे तुम्हीच एका असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल.

सापाने (Snake) गिळलेली पिशवी प्लास्टिकची असल्याने सापाला ती पचवता आली नाही. त्यात ती घशात अडकल्याने या सापाला श्वासही घेता येत नव्हता. त्यामुळे काही दिवसातच या सापाचा मृत्यू झाला असता. मात्र सर्पमित्रांनी या सापाच्या घशातील प्लास्टिक पिशवी काढली आणि त्याचा जीव वाचवला.

ही संपूर्ण घटना जेवढी थरारक आहे. त्यापेक्षाही जास्त मानवाकडून केला जाणारा प्लास्टिकचा वापर आणि बेजबाबदारी अधोरेखित करणारी आहे हे लक्षात घ्यायला हवं.

आपल्यापैकी अनेकजण ऑनलाईन वस्तू मागवतात त्यात खाण्या पिण्याचे पदार्थ प्लास्टिक पिशवीने रॅप केलेले असतात. आपण पदार्थ काढून घेतो आणि पिशव्या रस्त्यावर टाकतो. त्या पिशव्यांना खाद्य पदार्थांचा वास तसाच राहतो आणि त्या वासामुळे जनावरे पिशव्या खातात.

अशाच पद्धतीने प्लास्टिक बॉटल आणि त्याची झाकणे आपण उघड्यावर फेकतो ज्यामध्ये अडकून अनेक मुके जीव नाहक मरतात हे थांबायला हवं. तरच आपण निसर्गाचा समतोल राखण्यात यशस्वी होऊ शकतो.

Snake Eaten Plastic Bag
Solapur Crime News: रीलस्टार अभिनेत्रीशी असभ्य वर्तन; माजी नगरसेवक पुत्राला पोलिसांकडून समज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com