SC Notice To ED: सर्वोच्च न्यायालयाने ईडीला बजावली नोटीस, काय आहे प्रकरण?

Delhi Liquor Case: SC Notice To ED: सर्वोच्च न्यायालयाने ईडीला बजावली नोटीस, काय आहे प्रकरण?
Supreme Court issued notice to ED
Supreme Court issued notice to EDSaam Tv
Published On

Supreme Court Issued Notice To ED:

दारू घोटाळा प्रकरणी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी डिसेंबरमध्ये होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने तपास यंत्रणा ईडीला डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने संजय सिंह यांना कनिष्ठ न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्याची सूचना केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Supreme Court issued notice to ED
Antarwali Sarati Lathicharge: अंतरवली सराटी लाठीचार्ज प्रकरणातील सत्य बाहेर येणार, कोणालाही सोडणार नाही: गृहमंत्री फडणवीस

सर्वोच्च न्यायालयाची ईडीला नोटीस

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आप नेते संजय सिंह यांना सांगितले की, अटकेला आव्हान देण्याऐवजी त्यांनी खालच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज करायला हवा होता. यासोबतच संजय सिंह यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तपास यंत्रणा ईडीला नोटीस बजावली असून डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.  (Latest Marathi News)

दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती याचिका

दरम्यान, ईडीने 4 ऑक्टोबर रोजी संजय सिंह यांना दारू घोटाळा प्रकरणी अटक केली होती, त्यानंतरपासून ते अजूनही न्यायालयीन कोठडीत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 20 ऑक्टोबर रोजी त्यांची याचिका फेटाळली होती. कायदा सर्वांसाठी समान आहे, मग तो नेता असो वा सामान्य नागरिक, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. न्यायालयाने म्हटले आहे की, संजय सिंह यांना कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची गरज नाही.

Supreme Court issued notice to ED
IPS Exam: IPS अधिकारी होण्यासाठी उंची आणि वजन किती असावे लागते? 'या' एका कमतरतेमुळे सरकारी नोकरीच स्वप्न भंगू शकतं

च्च न्यायालयानंतर संजय सिंह यांनी आपल्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ईडीच्या आरोपपत्रात संजय सिंह यांच्यावर 82 लाख रुपयांच्या देणग्या घेतल्याचा आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com