उत्तर प्रदेशमध्ये आईने तीन मुलींचा खून करून आत्महत्या केली.
नवरा-बायकोच्या वादामुळे ही दुर्दैवी घटना घडली.
आईचं नाव तेजकुमारी असून तिनं ७, २ वर्षांच्या मुली आणि पाच महिन्याच्या बाळाचा जीव घेतला.
घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
mother kills three daughters and commits suicide full story : नवरा-बायकोच्या भांडणामुळे निष्पाप ३ मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. उत्तर प्रदेशमधील बागपत येथील टीकरीमध्ये आईने पोटच्या ३ मुलींची हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आयुष्याचा दोर कापला. नवरा-बायकोच्या वादामुळे अख्ख्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय. एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने टिकरी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास करण्यात येतोय.
नवरा बायकोचा वाद काही नवा नाही. पण हा वाद टोकाला गेल्यानंतर कुटुंबातील सुख-शांती लोप पावते. उत्तर प्रदेशमध्येही अशीच घटना घडली आहे. नवरा-बायकोचा वाद टोकाला गेला. बापावर संतापलेल्या आईने पोटच्या तीन निरागस मुलींचा जीव घेतला. त्यानंतर मातेनं गळफास घेऊन आयुष्याचा दोर कापला. या धक्कादायक घटनेमुळे बागपतमध्ये हळहळ व्यक्त होतोय.
टोकाचा निर्णय घेणाऱ्या आईचे नाव २९ वर्षीय तेज कुमारी असे आहे. तिने आपल्या पोटच्या तीन मुलींना संपवलं. मिळाल्या माहितीनुसार, तेज कुमारीने आधी ७ वर्षाच्या गुंजनचा ओढणीने गळा दाबून खून केला. त्यानंतर २ वर्षाचा किट्टो आणि पाच महिन्याच्या मिराचाही जीव घेतला. त्यानंतर पंख्याला गळफास लावून आपल्याही आय़ुष्याचा दोर कापला. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चारही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. नवरा-बायकोच्या वादामुळे ही दुर्देवी घटना घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलेय.
या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच एसपी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे एसपींनी सांगितले. ते म्हणाले की, "नवरा-बायकोच्या वादाचं प्रकरण समोर आले आहे. सर्व घटनेची चौकशी केली जाईल. मृतक महिलेचा नवरा विकास हा चालक आहे. कौटुंबिक वातानंतर महिलेने हे भयंकर पाऊल उचलले. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. " दरम्यान, ३ निरागस मुलींचा मृत्यू झाल्यामुळे अख्ख्या जिल्ह्यालाला हादरवून टाकलेय. पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.