मुंबई लोकलमध्ये सीटवरून दोन प्रवाशांमध्ये भांडण झाले.
ठाणे-वाशी मार्गावरील ट्रेनमध्ये ही घटना घडली.
सहप्रवाश्यांनी हस्तक्षेप करून वाद थांबवला.
हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Thane-Vashi Train Video News : मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकलमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रवाशांमध्ये हाणामारीच्या घटना वारंवार घडत आहेत. ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्गावरील एका लोकल ट्रेनमध्ये दोन प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. लोकलमधील सीटसाठी झालेल्या बाचाबाचीमधून दोन जणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. दोन जणांचा वाद ट्रेनमधील सहप्रवाश्यांना मध्यस्थी करून मिटवला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लोकल ट्रेनमधील गर्दी आणि तणावाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. Why do passengers fight in Mumbai local trains?
कामाच्या वेळी लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सकाळी गर्दीच्या वेळी ठाणे स्टेशनहून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये दोन तरुण प्रवाशांची तुंबळ हाणामारी झाली. सीट मिळवण्यावरून दोघांमध्ये मारामारी झाली. एकमेकांची कॉलर पकडून मारामारी केल्याचे व्हिडिओत दिसतेय. दोघांनी एकमेकांवर जोरात बुक्क्या मारल्याचेही दिसतेय. लोकलमधील इतर प्रवाश्यांना याचा त्रास होऊ लागला, पण सुरुवातीला कोणी हस्तक्षेप केला नाही. मात्र हाणामारी तीव्र झाल्यावर काही सहप्रवाश्यांनी पुढाकार घेऊन दोघांना वेगळे केले आणि भांडण थांबवले. यावेळी कोणाला गंभीर जखम झाल्याची नोंद नाही.
लोकलमधील हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ट्रेनच्या डब्यात दोघेही एकमेकांना जोरात बुक्क्या मारत आहे. इतर प्रवासी ओरडत भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावरील यूजर्सनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी लोकल ट्रेनमधील सीटसाठी होणाऱ्या वादांना 'दैनंदिन समस्या' म्हटलेय. मुंबई लोकल ट्रेनमधील वादाच्या अशा घटना नवीन नाहीत. दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. त्यामुळे सीट, हवेशीर जागा आणि छोट्या-मोठ्या कारणांवरून वाद होतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.