नर्तिकीच्या नादात माजी उपसरपंचाने गोळी झाडून आयुष्य संपवलं, मेहुण्याने जे सांगितलं ते वाचून थक्क व्हाल

Govind Barge Beed suicide case explained : माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय 38, लुखामसला, बीड) असे नाव आहे. नर्तिका पूजाकडून वारंवार पैशांसाठी तगादा लावला जात होता व ब्लॅकमेल केलं जात असल्याचा संशय आहे. पोलिसांना कारमध्ये एक पिस्तूल सापडले, ज्याने गोळी झाडून आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे.
Govind Barge Beed suicide case explained
Govind Barge Beed suicide case explained
Published On
Summary
  • माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली

  • नर्तिका पूजाकडून ब्लॅकमेल होत असल्याने आत्महत्येचा संशय

  • लाखोंची संपत्ती, प्लॉट, सोने-नाणे यापूर्वी तिच्या नावावर दिल्याची माहिती

  • पोलिस तपासात आत्महत्या की खून यावरून अजूनही पडताळणी सुरू

Dancer accused of blackmail in Beed suicide case : नर्तिकीच्या नादाने माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी स्वतःला आत्महत्या केल्याचे संशय मयताचा मेहुणा लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीत केला आहे. माजी उपसरपंचाने स्वतःच्या पिस्टलने कानाजवळ गोळी झाडल्याच्या प्रकरणात नवा ट्वीटस्ट आला आहे. आधीच लाखो रूपयांची संपत्ती निर्तिकीच्या नावावर केली होती. पण तरीही तिच्याकडून ब्लॅकमेल केले जात होते. त्या त्रासातून गोविंद यांनी स्वत:वर गोळी झाडली, असे समजतेय.

यासंदर्भात 21 वर्षीय पूजा हिने फिर्यादीचे भावजी गोविंद यांच्यासोबत कला केंद्रात झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन प्रेमसंबंध ठेवले. वेळोवेळी पैसे, सोनेनाणे हे मावशी आणि इतर नातेवाइकांच्या नावावर प्लॉट जमीन यापूर्वी घेऊन दिलेली आहे. आणखीन भावाच्या नावावर पाच एकर शेती करण्याचा किंवा गेवराईतील नवीन घर नावावर कर नाहीतर तुला बोलणार नाही. तुझ्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. पैसे देण्याकरिता वारंवार तगादा लावल्याने फिर्यादीचे भावजी गोविंद यास स्वतःच्या पिस्टलने डोक्यात कानाजवळ गोळी घालून आत्महत्या करण्यास परावृत्त केले म्हणून पूजा देविदास गायकवाड हिच्याविरुद्ध मयताचा मेहुणा लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण याने फिर्याद दिली आहे.

Govind Barge Beed suicide case explained
VP Election : मोदींचा राहुल गांधींना मोठा झटका, इंडिया आघाडीची १५ मते फुटली, राजधानीत मोठ्या घडामोडी

38 वर्षीय गोविंद जगन्नाथ बर्गे असे मरण पावलेल्या माजी उपसरपंचाचे नाव आहे. बीडच्या गेवराई तालुक्यात लुखामसला येथील गोविंद बर्गे हा प्लॉटिंगचा व्यवसाय करत असतानाच त्याचा संपर्क पारगाव थिएटरमधील नर्तिका पूजा हिच्याशी आला. दोघांची जवळीक वाढली. दरम्यान, या काळात गोविंद बर्गे याने काही दिवसांपूर्वी सोन्यानाण्यांसह पावणेदोन लाखांचा एक मोबाइलही तिला घेऊन दिला होता,अशी माहिती पुढे आली आहे.दरम्यान,दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. याचा समेट घडवण्यासाठी सोमवारी मध्यरात्री गोविंद हा सासरे येथे कारमधून मुलीच्या घरी आला.

Govind Barge Beed suicide case explained
Kunbi Maratha : सर्वात मोठी बातमी! ८ जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरूवात

पोलिसांना कारमध्ये एक पिस्तूलही आढळून आली. या पिस्तुलीनेच डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली असावी, असा प्रथम अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, घटनास्थळी पोलिसांना संशयास्पद काही गोष्टी आढळल्या असून, हा खून आहे की आत्महत्या? याचीदेखील पडताळणी ते करीत आहेत. त्याच्या पश्चात पत्नी,मुलगी,मुलगा असा परिवार आहे.

Govind Barge Beed suicide case explained
Pune : पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार, रात्री ११ वाजता मावळ हादरलं, नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com