VP Election : मोदींचा राहुल गांधींना मोठा झटका, इंडिया आघाडीची १५ मते फुटली, राजधानीत मोठ्या घडामोडी

INDIA alliance cross voting impact on Vice Presidential polls : उपराष्ट्रपती निवडणुकीत भाजप समर्थीत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन विजयी ठरले. काँग्रेसचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डींना एकूण 300 मतं मिळाली. इंडिया आघाडीतील 15 खासदारांची मतं फुटल्यामुळे पराभव अधिकच लज्जास्पद ठरला.
rahul gandhi
rahul gandhi saam tv
Published On
Summary
  • उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे सीपी राधाकृष्णन विजयी

  • इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींचा पराभव

  • इंडिया आघाडीतील 15 मतं फुटल्याचं स्पष्ट

  • निकालानंतर इंडिया आघाडीच्या अंतर्गत फूटिवर चर्चा सुरू

Why INDIA bloc lost 15 votes in Vice President election 2025 : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ट्विस्ट आणणाऱ्या इंडिया आघाडीला मोठा झटका बसलाय... सीपी राधाकृष्णन विजयी झाले असले तरी इंडिया आघाडीची मतं फुटली आहेत. मात्र किती मतं फुटली? पाहूयात.

जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय.. इंडिया आघाडीची मतं फुटली आणि काँग्रेसच्या बी सुदर्शन रेड्डींचा पराभव झाला (CP Radhakrishnan elected as 15th Vice President of India) तर भाजपचे सी पी राधाकृष्णन भारताचे 15 वे उपराष्ट्रपती बनलेत. मात्र या निवडणुकीत मतांचं गणित नेमकं कसं होतं? पाहूयात...

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी लोकसभा आणि राज्यसभेतील 788 पैकी 7 जागा रिक्त आहेत... त्यापैकी 767 खासदारांनी मतदान केलं...तर 752 मतं ही वैध ठरली...त्यामुळे विजयाचा कोटा 367 पर्यंत खाली आला... तर या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींना 300 तर एनडीएच्या सी पी राधाकृष्णन यांना 452 इतकी मतं मिळाले. खरंतर एनडीएकडे बहुमत असतानाही इंडिया आघाडीने प्रादेशिक अस्मिता डोळ्यासमोर ठेऊन बी सुदर्शन रेड्डींना मैदानात उतरवलं आणि निवडणुकीत चुरस आणली... ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने बॅलेटवर असल्याने इंडिया आघाडीने क्रॉस व्होटिंगवर लक्ष्य केंद्रित केलं.. मात्र अखेर एनडीएची मतं आपल्याकडे वळवण्यासाठी रणनीती आखलेल्या इंडिया आघाडीच्याच खासदारांची मतं फुटल्याचं समोर आलंय...ते नेमकं कसं पाहूयात...

rahul gandhi
Pune : पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार, रात्री ११ वाजता मावळ हादरलं, नेमकं काय घडलं?

एकूण 781 मतांपैकी एनडीएकडे 437 तर इंडिया आघाडीकडे 330 इतकं संख्याबळ होतं.. मात्र 15 मतं अवैध ठरले.. त्यानंतरही एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना 452 इतकी मतं मिळालेत.. तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डींना 300 मतं मिळाले.त्यामुळे इंडिया इंडिया आघाडीची 15 मतं फुटल्याचं समोर आलंय. इंडिया आघाडीने पूर्ण जोर लावूनही विजय मिळवता तर आलाच नाही... उलट खासदार फुटल्याने इंडिया आघाडी तोंडघशी पडलीय.. त्यामुळे हे फुटलेले खासदार कोणत्या पक्षाचे? आणि खासदार फुटीमुळे आगामी काळात इंडिया आघाडीला तडे जाणार का? याचीही चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरु लागलीय...

rahul gandhi
लेक प्रेमात पडली, बाप हैवान झाला! मुलीचा झोपेतच गळा आवळला, नंतर जे केलं ते वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com