Sangli Accident : कारने बाईकला चिरडलं, आजी-आजोबा अन् नातवाचा जागीच मृत्यू, सांगलीत भयानक अपघात

Sangli Tasgaon accident News : सांगलीच्या तासगावमध्ये अपघातात आजी, आजोबा आणि ५ वर्षीय नातवाचा जागीच मृत्यू झाला. मृत तिघे पलूस तालुक्यातील बुर्ली गावचे रहिवासी होते.
Sangli Tasgaon accident News
Sangli Tasgaon accident scene where grandparents and a grandson lost their lives in a horrific car-bike collision.Saam TV Marathi News
Published On
Summary
  • सांगलीच्या तासगावजवळ कार आणि दुचाकीची भीषण धडक.

  • अपघातात आजी, आजोबा आणि नातवाचा जागीच मृत्यू.

  • मृत व्यक्ती बुर्ली गावचे रहिवासी असल्याचे समजते.

  • कारमधील चारजण जखमी, रुग्णालयात उपचार सुरू.

विजय पाटील, सांगली प्रतिनिधी

Sangli Tasgaon accident today full details : सांगलीमधील तासगावमध्ये कार आणि दुचाकीचा भयानक अपघात जाला आहे. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तासगावजवळ एका कारने दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामध्ये आजी-आजोबा आणि नातवाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालायत उपचार सुरू आहेत. मृत तीन जण हे बुर्लीचे येथील असल्याचे समजतेय. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

आजी-आजोबा आणि नातवाचा भीषण अपघातामध्ये जागीच मृत्यू झाा आहे. तिघेजण दुचाकीवरून घराकडे परत येत होते. त्यावेळी तासगाव-भिलवडी मार्गावर समोरून आलेल्या कारने जोरात धडक दिली. ही धडक इतकी भयानक होत की दुचाकीचा चुराडा झाला. दुचाकीवरील आजी-आजोबा आणि नातवाचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील चार जणही गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात केली. स्थानिकांनी तात्काळ जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. शिवाजी बापू सुतार (वय 57 वर्ष), आशाताई शिवाजी सुतार (55 वर्ष) आणि वैष्णव ईश्वर सुतार (वय 5 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण पलूस तालुक्यातील बुर्ली येथील रहिवासी होते.

Sangli Tasgaon accident News
नर्तिकीच्या नादात माजी उपसरपंचाने गोळी झाडून आयुष्य संपवलं, मेहुण्याने जे सांगितलं ते वाचून थक्क व्हाल

सांगलीच्या तासगावजवळ चारचाकी कार आणि दुचाकीचा भीषण अपघातात तीन जण झाले. तर चार जण जखमी झाले आहेत. या अपघातात आजी, आजोबा व नातवाचा दुर्दैवी अंत झाला आहे. शिवाजी बापू सुतार, वय-57, आशाताई शिवाजी सुतार-वय -55 आणि वैष्णव ईश्वर सुतार- वय -5,अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण पलूस तालुक्यातील बुर्ली येथील असून दुचाकीवरून नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. परत येत असताना तासगाव- भिलवडी मार्गावर समोरून येणाऱ्या चारचाकीला जोरदार धडक झाली. त्यामध्ये दुचाकीवरील आजी,आजोबा आणि नातू असे तिघे जण जागीच ठार झाले. तर चारचाकी गाडी ही रस्त्याच्या कडेला जाऊन द्राक्षबागेत कोसळल्याने चारचाकी मधील चौघेजण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व जखमी हे शिक्षक दिनाच्या निमित्ताने कडेपूर येथे आयोजित पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहून तासगाव मार्गे सांगलीला परतत होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.

Sangli Tasgaon accident News
VP Election : मोदींचा राहुल गांधींना मोठा झटका, इंडिया आघाडीची १५ मते फुटली, राजधानीत मोठ्या घडामोडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com