Tamil Nadu Election: रिक्षावाला बनला आमदार ! दोन दिग्गज नेत्यांना चारली धूळ

Auto Rickshaw Driver Wins Mla Seat TamilNadu: तमिळनाडूमध्ये रिक्षा चालक विजय धामू यांनी दिग्गज नेत्यांना पराभूत करत आमदारपद पटकावले. सामान्य माणसाच्या या विजयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडल्याची चर्चा रंगली आहे.
Vijay Dhamu celebrates his historic victory after defeating top leaders in Royapuram constituency.
Vijay Dhamu celebrates his historic victory after defeating top leaders in Royapuram constituency.saam tv
Published On

लोकशाहीमध्ये जनताच खरी मालक असते आणि जेव्हा ती बदल घडवण्याचा निर्धार करते. तेव्हा मोठमोठे गड ढासळले जातात. असाच काहीसा चमत्कार तमिळनाडूच्या रॉयपुरम मतदारसंघात पाहायला मिळाला आहे. एका सामान्य रिक्षा चालकाचा विजय मिळाला आहे. साऊथचा सुपरस्टार विजय थलपती याच्या TVK पक्षाचे उमेदवार विजय धामु यांनी जागेवर ऐतिहासिक विजय मिळवला असून सध्या संपूर्ण देशात त्यांच्या नावाची चर्चा आहे.

Vijay Dhamu celebrates his historic victory after defeating top leaders in Royapuram constituency.
दिल्लीहून शिर्डीकडे येणारे विमान भरकटलं; हवेतच घिरट्या, नागरिकांची धावपळ|VIDEO

कोण आहेत विजय धामू?

विजय धामू यांची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये. तर ते आपली रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे एक सामान्य नागरिक आहेत. मात्र जेव्हा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. धामू यांनी तमिळनाडूच्या राजकारणातील दोन दिग्गज नेत्यांना धूळ चारली असून जायंट किलर ठरले आहे.

Vijay Dhamu celebrates his historic victory after defeating top leaders in Royapuram constituency.
आसाममध्ये काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेशाध्यक्षाचा दारुण पराभव

या दिग्गजांनी चारली धूळ

आज लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अनेक बड्या नेत्यांना झटका बसला असून तामिळनाडूमध्ये सत्तापालट झाली आहे. विजय धामू यांनी (AIADMK) चे नेते डी.जयकुमार आणि माजी मंत्री रहमान खान यांचे चिरंजीव यांचा दारुण पराभव केला. एकीकडे प्रदीर्घ राजकीय अनुभव, वारसा आणि मोठ्या पक्षांची साथ असलेले होते.

Vijay Dhamu celebrates his historic victory after defeating top leaders in Royapuram constituency.
पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता; ममतांना झटका; EXIT POLL च्या अंदाजामुळं देशाच्या राजकारणात खळबळ

एकीकडे प्रदीर्घ राजकीय अनुभव, वारसा आणि मोठ्या पक्षांची साथ असलेले दिग्गज होते. तर दुसरीकडे केवळ जनतेचा विश्वास आणि रोज रस्त्यावर धावणारी रिक्षा घेऊन उतरलेले विजय धामू होते. रॉयपुरमच्या जनतेने यावेळी कोणत्याही मोठ्या चेहऱ्याला किंवा पक्षाला नाही, तर आपल्यातीलच एका सामान्य माणसाला कौल दिला आहे. अभिनेता विजय याच्या 'TVK' पक्षाने तामिळनाडूच्या राजकारणात ज्या पद्धतीने पाऊल ठेवले आहे, त्याने राज्याचे संपूर्ण राजकीय चित्रच बदलून टाकले आहे. विजय धामू यांचा हा विजय तामिळनाडूच्या बदलत्या राजकारणाची नवी ओळख बनला आहे. कालपर्यंत जो रस्त्यावर प्रवाशांची ने-आण करत होता, आज जनतेने त्याला आपल्या अपेक्षांचा 'सारथी' बनवून विधानसभेत पाठवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com