

बॉन्डी बीचवर हनुक्का सेलिब्रेशनदरम्यान रक्तरंजित थरार
बाप-लेकांनी जमावावर अंदाधुंद गोळीबार केला
आरोपी बाप-लेक पाकिस्तानी नागरिक
गोळीबारात १६ जणांचा मृत्यू तर ४० हून अधिक जखमी
थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर होतात व्हायरल
ऑस्ट्रेलियाच्या बॉन्डी बीचवर रविवारी रक्तरंजित थरार झाला. बीचवर हनुक्का सेलिब्रेशन सुरू असताना बाप-लेकाने जमावावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये १६ जणांचा मृत्यू झाला तर ४० जण जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. साजिद अकरम (५० वर्षे) आणि नवीद अकरम (२४ वर्षे) या बाप-लेकाने हा गोळीबार केला. या घटनेचे अनेक थरकाप उडवणारे व्हिडीओ समोर आले आहेत. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी बाप-लेक असून ते पाकिस्तानी नागरिक आहेत. आरोपींमधील ५० वर्षीय साजिद अकरमला पोलिसांनी गोळ्या झाडल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर २४ वर्षीय आरोपी नवीदवर देखील पोलिसांनी गोळ्या झाडल्या. तो जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवीन अकरमकडे ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समधील ड्राइव्हिंग लायसन्स होते.
दोन्ही आरोपी विकेंड सेलिब्रेशनसाठी आणि मासेमारी करण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते आणि त्यांनी हे भयंकर कांड केले. साजिद आणि नवीन यांनी घराबाहेर पडताना सांगितले होते की, दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्यावर मासेमारीसाठी जात आहोत. आरोपींबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी ते राहत असलेल्या सिडनीच्या पश्चिमेकडील बोनीरिग येथील घरावर छापा टाकत तपासणी केली.
नावेदची आई म्हणाली की, तिचा मुलगा बेजोरगार आहे. त्याने रविवारी सकाळी कुटुंबाशी शेवटचे बोलणे केले होते. तो आठवड्याच्या शेवटी त्याच्या वडिलांसोबत जर्विस बे येथे गेला होता. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून ६ परवानाधारक बंदुका जप्त केल्या. साजिदकडे १० वर्षांपासून बंदुकीचा परवाना होता. एका संशयिताच्या गाडीत एक आयईडी आणि आयसिसचा ध्वज सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. साजिद एका बंदूक क्लबचा सदस्य होता.
या दहशतवादी हल्ल्यादरम्यान ४३ वर्षीय अहमद अल अहमद याची चर्चा होत आहे. या व्यक्तीने गोळ्या लागून देखील हल्लेखोराच्या हातातील बंदूक हिसकावून घेतली आणि अनेकांचा जीव वाचवला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याचे कौतुक होत आहे. जखमी झालेल्या या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.