Arvind Kejriwal Attack Video : मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांच्या कारवर दगडफेक, प्रचारादरम्यान घडली घटना

Arvind Kejriwal Latest News : अरविंद केजरीवाल यांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना घडली. निवडणुकीच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याची घटना घडली आहे.
Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal Attack VideoSaam tv
Published On

दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याचदरम्यान, शनिवारी दुपारी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही घटना घडल्याची घडली आहे. या घटनेनंतर आपने भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal: केजरीवालांना घेरण्यासाठी भाजपचा प्लॅन तयार, माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाला देणार संधी, दिल्लीचं राजकारण तापणार

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादम्यान अरविंद केजरीवाल यांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. स्थानिक गुंडांनी दगडफेक केल्याचा आरोप आपने केला आहे. स्थानिक लोकांनी दगडफेकीनंतर कथित गुंडांना पळवल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेनंतर दिल्लीत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .

Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal: पुजाऱ्यांना दरमहा मिळणार ₹ 18000 ; केजरीवालांची घोषणा, नेमकी काय आहे योजना?

आम आदमी पक्षाने कथित हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने भाजप घाबरल्याचा आरोप आपने केला आहे. भाजपने त्यांच्या गुंडांकडून अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आपने केला आहे. आपने आरोप केला आहे की, भाजप उमेदवार परवेश वर्मा यांनी प्रचार करताना त्यांच्या गुंडांकडून वीट, दगडांनी हल्ला करून दुखापत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आम्ही अशा हल्ल्यांना घाबरणारे नाहीत. दिल्लीची जनता याचं जोरदार उत्तर देईल'.

Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal Net Worth: अरविंद केजरीवाल कोट्यधीश, पण स्वतःचं घर नाही; एकूण संपत्ती किती?

आम आदमी पक्षाच्या आरोपानंतर भाजपनेही प्रतुत्तर दिलं. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी सांगितलं की, 'केजरीवाल यांची काळ्या रंगाची कार आमच्या कार्यकर्त्यांना चिरडून चालली होती. यामुळे आमच्या एका कार्यकर्त्याचा पाय मोडला. मी त्याला पाहायला निघालो आहे. मागील ११ वर्षापासून असलेल्या केजरीवाल सरकारमुळे दिल्लीत फक्त भ्रष्टाचार झाला. दिल्लीचं मोठं नुकसान झालं. ११ वर्षात यमुना नदीमधील घाण स्वच्छ करण्यात आली नाही. आता या नदीचं रुप नाल्यासारखं झालं आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com