

अरविंद केजरीवालांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले
न्यायमुर्तींच्या निष्पक्षतेवर आरोप
दिल्ली मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित वाद
न्यायालयीन आणि राजकीय वर्तुळात खळबळ
अरविंद केजरीवाल... आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री. आता पुन्हा चर्चेत आलेत ते थेट न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केल्यानं...
अरविंद केजरीवाल यांना सत्र न्यायालयानं कथित मद्य घोटाळा प्रकरणी दोषमुक्त केलं. मात्र त्यानंतर ईडीनं उच्च न्यायालयात धाव घेतली आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी अवघ्या 10 मिनिटात सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवला. त्यावर केजरीवाल यांनी काय भाष्य केलंय. तुम्हीच ऐका...
एवढंच नाही तर केजरीवालांनी याआधी जामीनाच्या अर्जावेळी सुनावणी घेतांना न्यायमुर्तींनी जामीन द्यायचा की नाही हे ठरवण्याऐवजी जवळजवळ त्यांना दोषीच ठरवलं होतं, असंही केजरीवाल यांनी म्हटलंय. केजरीवाल एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी न्यायमुर्ती स्वर्णकांता शर्मा या आरएसएसच्या कार्यक्रमाला गेल्याचा दाखला देत त्यांच्या निष्पक्षतेवरच सवाल उपस्थित केलाय.
याबरोबरच केजरीवाल यांनी अर्धा तास युक्तीवाद करताना न्यायमुर्तींवर गंभीर सवाल उपस्थित केले. न्यायमुर्ती शर्मांचा मुलगा सॉलिसीटर जनरल तुषार मेहतांकडे प्रॅक्टीस करतो. तुषार मेहता सीबीआयचे वकील आहेत. मग न्यायमुर्ती मेहतांविरोधात निकाल कशा देतील? असा सवाल केजरीवाल यांनी केलाय. एवढंच नाही तर कौटुंबिक हितसंबंधाचा आरोप करत केसमधून माघार घेण्याची मागणीच केजरीवालांनी केलीय.
केजरीवालांनी न्यायालयातच न्यायमुर्तींबद्दल थेट संशय व्यक्त केल्यानंतर न्यायमुर्ती स्वर्णकांता शर्मांनी केजरीवालांच्या युक्तीवादाचं कौतूक केलं. त्यानंतर तुम्ही वकील असायला हवे होता असंही म्हटलं. मात्र केजरीवालांनी बेधडकपणे केलेल्या युक्तीवादामुळे न्यायव्यवस्थेवरच प्रश्न निर्माण झालाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.