Andhra Pradesh Government Hospital: हृदयद्रावक! सरकारी रुग्णालयात ८ रुग्णांचा गुदमरुन मृत्यू; धक्कादायक कारण आलं समोर

Death of Patients By Suffocation: ऑक्सिजन कमतरता असल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचं मृतांच्या नातेवाईकांनी म्हटलंय.
Andhra Pradesh Government Hospital
Andhra Pradesh Government HospitalSaam TV
Published On

8 Patients Dies In Government Hospital: आंध्र प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका रुग्णालयातील ८ रुग्णांचा ऑस्किजन अभावी गुदमरून मृत्यू झालाय. ऑक्सिजन कमतरता असल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचं मृतांच्या नातेवाईकांनी म्हटलंय. हॉस्पीटल प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी देखील नातेवाईकांंनी केलीये. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नेल्लोर शहरातील सरकारी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडलाय. रुग्णालय अधिकाऱ्यांना या घटनेविषयी विचारले असता त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी केलेले आरोप अधिकाऱ्यांनी फेटाळून लावेत.

Andhra Pradesh Government Hospital
Mumbai Crime: खिडकीतून घुसून मॅकडोनाल्डमध्ये चोरी; संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, २ तासात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

रुग्णालयातील (Hospital) आठ व्यक्ती दगावल्यात हे खरं आहे. मात्र त्यांचा मृत्यू ऑक्सिजनच्या (Oxygen) कमतरतेने झालेला नाही. ते सर्व रुग्ण विविध आजारांनी त्रस्त होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

जिल्हाधिकाऱ्यांना या बाबत सविस्तर अहवाल देण्यात आलाय. आठ मृत रुग्णांपैकी सहा रुग्णांना हॉस्पिटलच्या मेडिकल इंटेसिव्ह केअर युनिट (MICU) वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं. या घटनेनं संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण पसरलं आसून रुग्णालयातील इतर रुग्ण देखील भयभीत झालेत.

Andhra Pradesh Government Hospital
Nanded Crime News: खळबळजनक! पार्किंगच्या वादातून तरुणाचा हात छाटला; पोलिसांनी शहरातून धिंड काढत उतरवली मस्ती

कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत होती. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या काळातच अनेक खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये देखील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी देशभर ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आलेत. मात्र तरी देखील आता पुन्हा एकदा ऑक्सिजन अभावी रुग्णांचा तरफडून मृत्यू झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com