लोहगड हत्याकांडाहून भयंकर प्लान! १९ वर्षाच्या हसिनीनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, गूढ उलगडल्यानंतर पोलिसही हादरले

Aandhra Pradesh Crime News : आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. पत्नी, प्रियकर आणि अन्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.
WIFE ALLEGEDLY PLOTS HUSBAND'S MURDER WITH BOYFRIEND DURING TEMPLE TRIP IN ANDHRA PRADESH
WIFE ALLEGEDLY PLOTS HUSBAND'S MURDER WITH BOYFRIEND DURING TEMPLE TRIP IN ANDHRA PRADESHSaam Tv
Published On
Summary
  • आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात मंदिर दर्शनाच्या बहाण्याने नवऱ्याची हत्या

  • पत्नीने प्रियकराला लोकेशन पाठवल्याचा दावा पोलिसांच्या तपासात समोर

  • पत्नी, प्रियकर आणि अन्य दोन आरोपींना अटक

  • पोलीस तपास सुरु

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या नवऱ्याला देवळात घेऊन जाण्याचा बहाणा करत त्याची हत्या केली. धक्कादायक म्हणजे या सगळ्या प्रकरणात महिलेच्या बॉयफ्रेंडने देखील तिला साथ दिली. यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. कुटुंबियांच्या तक्रारीनुसार, आरोपी महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव रमेश असे आहे. तो तामिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्यातील सुलगिरी भागातील रहिवासी होता. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्याचा विवाह शांतीपुरम येथील १९ वर्षीय हसिनीसोबत झाला होता. या दोघांना एक लहान मुलगी असून रमेश होसूरमधील एका खासगी कंपनीत काम करत होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हसिनीचे तिच्या बालपणीच्या मित्र युगांधरसोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही हे संबंध कायम राहिल्याने रमेश हा त्यांच्या मार्गातील अडथळा ठरत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे रमेशची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

WIFE ALLEGEDLY PLOTS HUSBAND'S MURDER WITH BOYFRIEND DURING TEMPLE TRIP IN ANDHRA PRADESH
Skin Care : चेहऱ्यावर एकाच जागी वारंवार पिंपल येतोय? यामागे असू शकते 'हे' गंभीर कारण; वेळीच व्हा सावध

मंगळवारी हसिनीने रमेशला गुडुपल्ले मंडलातील मल्लप्पा कोंडावरील श्री मल्लेश्वर स्वामी मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा हट्ट धरला. बायकोचा हट्ट पूर्ण करण्यासाठी रमेशनेही होकार दिला. यानंतर रमेश आणि हसिनी आपल्या मुलीसह दुचाकीवरून मंदिराकडे जायला निघाले. प्रवासादरम्यान हसिनीने रमेशच्या नकळत युगांधरला मोबाईलद्वारे त्यांचे लोकेशन पाठवले. डोंगरावरील रस्त्याच्या एका तीव्र वळणाजवळ हसिनीने मुद्दाम आपली हँडबॅग खाली पाडली. बॅग उचलण्यासाठी रमेशने मोटरसायकल थांबवताच युगांधर आणि त्याचे साथीदार लपलेल्या ठिकाणाहून बाहेर आले. त्यांनी रमेशचा पाठलाग करून जवळच्या जंगलात नेले आणि धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला करून हत्या केली. या वेळी त्यांची लहान मुलगी घटनास्थळाजवळ असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

WIFE ALLEGEDLY PLOTS HUSBAND'S MURDER WITH BOYFRIEND DURING TEMPLE TRIP IN ANDHRA PRADESH
Snake Facts : सापांना कान नाहीत, मग ते आवाज कसे ऐकतात? ९९ टक्के लोकांना याबद्दल माहिती नाही

घटनेनंतर हसिनी आणि मुलगी घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली. तपासादरम्यान मंदिराच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये रमेश पत्नीसोबत मंदिरात जाताना दिसला, तर नंतर हसिनी इतर दोन पुरुषांसोबत त्याच मोटरसायकलवरून बाहेर पडताना आढळली. मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी काही तासांतच संपूर्ण कट उघडकीस आणला. आरोपी महिला, तिचा बॉयफ्रेंड आणि इतर दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com