Shocking : डायपरचे तुकडे खाल्ल्यानं २ वर्षीय मुलाचा मृत्यू; १४ तास एकटाच खोलीत तडफडला

America News : अमेरिकेतील इंडियानामध्ये २ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डायपर आणि भिंतीचे तुकडे खाल्ल्याने मृत्यू झाल्याचा संशय असून पालकांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.
Shocking : डायपरचे तुकडे खाल्ल्यानं २ वर्षीय मुलाचा मृत्यू; १४ तास एकटाच खोलीत तडफडला
America NewsSaam Tv
Published On
Summary
  • अमेरिकामध्ये २ वर्षीय मुलाचा मृत्यू

  • डायपर व भिंतीचे तुकडे खाल्ल्याचा संशय

  • पालकांच्या निष्काळजीपणामुळे घटना

  • पालक अटकेत, पोलिस तपास सुरू

अमेरिकेतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील इंडियानामध्ये एका २ वर्षीय मुलाचा डायपर आणि भिंतीचे तुकडे खाऊन मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पालकांच्या निष्काळजीपणावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून अमेरिकेतील स्थानिक पोलिसांनी मृत मुलाच्या पालकांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाच्या पालकांचे नाव ट्रेव्हर रिचर्ड हेस आणि कॅथरीन कार्टर असे आहे. ३० मार्च रोजी या दोघांनी त्यांच्या मुलाला शेवटचं पाहिलं असल्याचं म्हटलं. ३१ मार्च रोजी त्यांच्या २ वर्षीय मुलाला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला, आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.

Shocking : डायपरचे तुकडे खाल्ल्यानं २ वर्षीय मुलाचा मृत्यू; १४ तास एकटाच खोलीत तडफडला
Maharashtra Weather : महाराष्ट्रासाठी पुढील ५ दिवस महत्त्वाचे, उष्णेतची तीव्र लाट येणार; अकोल्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीशी पार

पोलीस तपासात असे समोर आले की, ट्रेव्हर रिचर्ड हेस आणि कॅथरीन कार्टर यांची परिस्थिती हालाखीची होती. त्यांचा मुलगा भूक लागल्यावर डायपर फाडून त्याचे तुकडे खायचा. तसेच भिंतीचे पापुद्रे देखील खायचा. ३१ मार्च रोजी त्याच्या अन्ननलिकेत भिंतीचा पापुद्रा अडकल्याने त्याला श्वास घेणं कठीण झालं.

Shocking : डायपरचे तुकडे खाल्ल्यानं २ वर्षीय मुलाचा मृत्यू; १४ तास एकटाच खोलीत तडफडला
Shocking : जत्रेत बेशुद्ध केलं, नंतर निर्जनस्थळी सामूहिक बलात्कार; तरुणीसोबत भयंकर घडलं

त्याचा काही क्षणात मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे १४ तास मृत मुलगा रूममध्ये तडफडत होता. मात्र आईवडिलांना या बद्दल माहिती नव्हती. सकाळी त्याचे आई वडील त्याला पाहण्यासाठी गेला असता, तो बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला सीपीआर देखील देण्यात आला, मात्र त्याने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले.

Shocking : डायपरचे तुकडे खाल्ल्यानं २ वर्षीय मुलाचा मृत्यू; १४ तास एकटाच खोलीत तडफडला
Crime News : दिल्ली हादरली! धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, रस्त्यावर फेकून दिलं नंतर...

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. यावेळेस पोलिसांना मृत मुलाच्या खोलीत डायपरचे तुकडे, भिंतीच्या रंगांचे तुकडे सर्वत्र पसरलेले आढळले. पोलिसांनी म्हटले की, पालकांच्या निष्काळजीपणामुळे या बाळाला आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी मृत मुलाच्या आई वडिलांना अटक करण्यात आली आहे, तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com