Shocking : जत्रेत बेशुद्ध केलं, नंतर निर्जनस्थळी सामूहिक बलात्कार; तरुणीसोबत भयंकर घडलं

Bihar Crime News : मुझफ्फरपूर येथे जत्रेदरम्यान तरुणीवर सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुंगीचे औषध देऊन तीन दिवस ओलीस ठेवल्याचा आरोप असून, पोलिसांनी FIR दाखल करण्यास उशीर केल्याने संताप व्यक्त होत आहे.
Shocking : जत्रेत बेशुद्ध केलं, नंतर निर्जनस्थळी  सामूहिक बलात्कार; तरुणीसोबत भयंकर घडलं
Bihar Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • जत्रेत तरुणीला गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार

  • तीन दिवस पीडितेला ओलीस ठेवल्याचा आरोप

  • FIR दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ

  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी अटकेत

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील गरहान ओ.पी. परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. एका जत्रेदरम्यान तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला, तसेच तिला तीन दिवस ओलीस ठेवण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे या गंभीर प्रकरणात पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली.काही दिवसांनंतर आरोपींवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली. या घटनेने तरुणीच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी बोचाहान पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिच्या मावशीवर सीतामढी रोडवरील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तरुणी मावशीसोबत रुग्णालयात थांबायची. यादरम्यान तिची ओळख एका तरुणाशी झाली. त्या तरुणाने मदतीच्या बहाण्याने तिचा मोबाईल नंबर घेतला आणि नंतर तिला एका जत्रेत भेटायला बोलावले.

Shocking : जत्रेत बेशुद्ध केलं, नंतर निर्जनस्थळी  सामूहिक बलात्कार; तरुणीसोबत भयंकर घडलं
Shocking : लग्नाला नकार दिल्याने तरुणाचं भयंकर कृत्य, आधी जीभ कापली, नंतर गळा चिरून मुलीची हत्या

जत्रेत आरोपीने तिच्या शीतपेयात गुंगीचे औषध मिसळले, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर ऋषी यादव आणि त्याच्या दोन साथीदारांनी तिला एका निर्जन मैदानावर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेचा आरोप आहे की, आरोपीने यापूर्वीही तिच्यावर बलात्कार केला होता आणि विरोध केल्यास तिला एका ऑर्केस्ट्राला विकण्याची धमकी दिली होती. तरुणी शुद्धीवर आली तेव्हा ती रुग्णालयात होती.

Shocking : जत्रेत बेशुद्ध केलं, नंतर निर्जनस्थळी  सामूहिक बलात्कार; तरुणीसोबत भयंकर घडलं
Crime News : दिल्ली हादरली! धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, रस्त्यावर फेकून दिलं नंतर...

पीडितेने सांगितले की, गुन्हा दाखल केल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली होती. या प्रकरणात पोलिसांचा निष्काळजीपणाही उघडकीस आला आहे. पीडिता एसकेएमसीएच ओपी आणि अहियापूर पोलीस ठाण्यात गेली, परंतु तिच्या तक्रारीवर तात्काळ कारवाई झाली नाही. एफआयआर दाखल करण्यासाठी तिने तीन दिवस घालवले. पीडितेने एक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस सक्रिय झाले आणि गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करून मुख्य आरोपी ऋषी यादवला अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेनंतरही पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com