

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला जगाला दिलासा
अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
इराणच्या जनतेचा रस्त्यावर उतरून जल्लोष
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणविरोधात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधीची घोषणा केली.इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची धमकी देणाऱ्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणने सैन्य कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला. दोन्ही देशांनी घेतलेल्या निर्णयाने इराणमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वेळेनुसार आज बुधवारी सकाळी पाच वाजल्यानंतर इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले करण्याचा आणि इराणला उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला होत. परंतु दिलेल्या अल्टिमेटमच्या आधीच इराण आणि अमेरिकेमध्ये दोन आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी करण्यात येत आल्याची घोषणा ट्रम्प यांनी केलीये. दोन्ही देशातील युद्ध थांबवण्यात चीन आणि पाकिस्तानने मध्यस्थी केल्याचं बोललं जातंय.
शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर इराणने पाकिस्तानमार्फत अमेरिकेकडे एक सविस्तर प्रस्ताव पाठवला होता.या प्रस्तावानुसार दोन्ही देशात वाटाघाटीसाठी चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशात 10 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये चर्चा सुरू होईल.
शस्त्रसंधी जाहीर होताच इराणमध्ये जल्लोष
अमेरिकेनं युद्धविरामाची घोषणा केली. या शस्त्रसंधीची घोषणा करताच इराणी नागरिकांकडून मोठा जल्लोष करण्यात आला आहे. इराणची जनता हातात ध्वज घेऊन रस्तावर उतरून जल्लोष करू लागली आहे. जवळपास 1 महिन्यापेक्षा अधिक काळ इराणविरोधात अमेरिका आणि इस्राइल यांच्यात युद्ध सुरु होतं. अखेर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा करताच इराणमध्ये जल्लोष सुरू झाला आहे.
पाकिस्तानच्या भारताविरोधात 'डिजिटल कुरापती'
लष्करी मैदानात पाकिस्तानने भारतासमोर नांगी टाकल्या आहेत. त्यानंतरही आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारताविरोधात 'डिजिटल कुरापती सुरू केल्या आहेत. ऑपरेशन सिंदूरदरम्यान नामुष्कीजनक पराभवानंतर पाकिस्तान आता बंदुकीऐवजी खोट्या माहितीचा आधार घेताना दिसत आहे. जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुखांनी एक मोठं 'इन्फॉर्मेशन ऑपरेशन' आखल्याची माहिती मिळतेय. अन्नासाठी टाहो फोडणाऱ्या पाकिस्तानने 'फेक नॅरेटिव्ह' पसरवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचं समोर आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.