US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

US-Iran War: इराण-अमेरिका युद्धात इराण आपल्या धमक्यांना भीक घालत नसल्यानं आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यात नवा प्लॅन शिजतोय. नेमका हा प्लॅन आहे तरी काय? पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून.
US-Iran War:
US-Iran War:
Published On

रोहित कदम, साम प्रतिनिधी

अमेरिकेनं वारंवार अल्टिमेटम देऊनही इराण काही मागे हटण्यास तयार नाहीये. तब्बल 39 दिवस सुरू असलेल इराण-अमेरिका युद्ध आता शेवटच्या टप्प्यावर आलाय. बेसुमार हल्ले आणि धमक्यांना इराण भीक घालत नसल्यानं आता ट्रम्प यांनी विनाशक असं पाऊल उचलल्याचं दिसतंय. होय अमेरिकेच्या आकाशातील हालचालींनी जगाची धडधड वाढवलीये. नेमकं असं काय शिजतंय ट्रम्प यांच्या डोक्यात. कारण अमेरिकेच्या आकाशात दिसलेलं डुम्स डे हे विमान आण्विक युद्धासाठी वापरलं जातं.

डूम्सडे प्लेनमुळं जगाला धडकी भरलीये. बोईंग कंपनीनं तयार केलेलं अमेरिकन हवाई दलाचं E-4B नाईटवॉच जातीचं विशेष विमान आहे. अणु युद्धावेळी विशेष कमांड आणि कन्ट्रोलसाठी या विमानाचा वापर केला जातो. या विमानात बसून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अण्वस्त्र हल्ला करण्याचा आदेश देऊ शकतात.

एका रात्रीत इराण बेचिराख करू अशी ट्रम्प यांनी दिलेली उघड उघड धमकी आणि आता डूम्स्डेच्या घिरट्या म्हणजे अमेरिकेचा इराणला मोठ्या युद्ध सज्जतेचा एकप्रकारे इशाराच आहे... त्यामुळे आता अमेरिकेच्या या हालचालींवर इराण काय उत्तर देते याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com