UP Elections: विधानसभाआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार; हायकोर्टाचे 3 महिन्यांत निवडणुका घेण्याचे निर्देश

UP Local Body Elections: उत्तर प्रदेशातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत अलाहाबाद हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. तीन महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.
UP PANCHAYAT ELECTIONS
UP PANCHAYAT ELECTIONSsaam tv
Published On: 

उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अलाहाबाद हायकोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. राज्यात येत्या तीन महिन्यांच्या अंत ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, विद्यमान ग्रामसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांना प्रशासक म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय कोर्टाने सुनावला आहे. ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यानंतर वर्तमान ग्रामसेवकांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याच्या मुद्द्यावर अलाहाबाद हायकोर्टात सुनावणी सुरू होती. याच प्रकरणात कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

UP PANCHAYAT ELECTIONS
IPS Transfer: १८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलीस दलात मोठा फेरबदल

या प्रकरणाची सुनावणी बुधवारी सुमारे तीन तास चालली. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर न्यायमूर्ती अजित कुमार आणि न्यायमूर्ती गरिमा प्रसाद यांच्या खंडपीठाने निकाल देत तीन महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले.

UP PANCHAYAT ELECTIONS
Elections : विधानसभा निवडणुकीआधीच राजकीय घडामोडींना वेग; भाजपसह ३ प्रमुख पक्षांनी आधीच डाव टाकला

हायकोर्टाच्या या आदेशानंतर उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला वेग येण्याची शक्यता आहे. मात्र निवडणुकांच्या तारखा आणि पुढील प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com