दिल्लीहून उड्डाण घेतलेल्या विमानाच्या ८ तास हवेतच घिरट्या; २३० प्रवाशांचा जीव टांगणीला

air india news : दिल्लीहून उड्डाण घेतलेल्या विमानाच्या ८ तास हवेतच घिरट्या घातल्याचे समोर आलं आहे. या घटनेमुळे २३० प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता.
air india news
air india Saam tv
Published On
Summary

दिल्लीहून निघालेल्या विमानात तांत्रिक बिघाड

विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे २३० प्रवाशांचा जीव टांगणीला

विमानाने ८ तास हवेत घातल्या घिरट्या

दिल्लीहून सेन फ्रान्सिको जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. या विमानाने दिल्लीहून उड्डाण घेतल्यानंतर तब्बल ८ तास हवतेच घिरट्या घातल्या. सुरक्षेच्या कारणात्सव या विमानाला पुन्हा दिल्लीत उतरवण्यात आलं. या विमानात एकूण २३० प्रवासी होते. विमानाच्या तांत्रिक बिघाडाची तपासणी केली जाणार आहे. परंतु विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर विमान प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, 'दिल्लीहून सेन फ्रान्सिकोला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे विमान अर्ध्या वाटेतून पुन्हा माघारी वळवण्यात आलं. विमान दिल्लीत सुरक्षितपणे उतरवण्यात आलं. या विमानाच्या तांत्रिक बिघाडाची तपासणी केली जाणार आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो'.

air india news
Maharashtra News Live Update: विधान परिषदेची जागा भाजपनेच लढवावी, आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी पुढे सांगितलं की, या प्रवाशांना सेन फ्रान्सिकोला जाण्यसाठी पर्यायी व्यवस्थेची सोय करण्यात आली. तसेच प्रवाशांना रिफ्रेशमेंट, हॉटेल, प्रवासाचे वेळापत्रक बदलण्याच्या सुविधा पुरवण्यात आल्या. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा हेच आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे'.

एअर इंडियाच्या विमानात पहिल्यांदा तांत्रिक बिघाड झाला नाही. मार्च महिन्यातही अशीच घटना घडली होती. विमान हे १९ मार्च रोजी दिल्लीहून व्हँकुव्हरला जाणार होते. एअर इंडियाचे हे विमान देखील ८ तास हवेत घिरट्या घातल्यानंतर पुन्हा दिल्लीत परतले होते.

मागील वर्षी १२ जून रोजी अहमदाबाद विमानाच्या अपघाताची घटना घडली होती. या अपघातात एकूण २७० जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक समस्या आढळून आल्या होत्या.

air india news
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीसोबत काँग्रेस करणार युती? बड्या नेत्याच्या ट्विटनं राजकीय वर्तुळात खळबळ

या अपघातामधून एकाचा जीव चमत्कारिकरित्या वाचला होता. या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या व्यक्तीला भेटायला रुग्णालयात गेले होते. अपघातामधून एकमेव वाचलेला व्यक्ती या घटनेनंतर नैराश्यात गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com