

पुणे -
विधान परिषदेची जागा भाजपनेच लढवावी, जिल्ह्यातील आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी
शहर आणि जिल्ह्यात पक्षाची वाढलेली ताकद, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्पष्ट संख्याबळ आणि मित्रपक्ष व स्थानिक आघाड्यांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता विधान परिषदेची जागा भाजपनेच लढवण्याची मागणी
पुणे जिल्ह्यातील भाजप आमदारांनी घेतली फडणवीस यांची भेट
भेटी दरम्यान महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात
मुंबई -
महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांच्यात बैठक पार पडणार
महायुतीच्या सर्व पालकमंत्र्यांना ही बैठकीचे निमंत्रण असल्याचे बोलले जात आहे
मंत्री शंबुराज देसाई यांच्या मेघदूत या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे
पुणे -
पुण्यातील सारसबाग पुढील दोन दिवस राहणार बंद
सारसबाग येथील दुरुस्तीच्या कामानिमित्त बाग बंद राहणार
तसेच तळ्यातील गणपतीचे मंदिर सुद्धा राहणार बंद
पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
२७ आणि २८ असे दोन दिवस सारसबाग राहणार नागरिकांसाठी बंद
नागपूर -
- विदर्भात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
-अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून नागरिक हैराण झाले आहेत.
- ब्रह्मपुरी आणि गडचिरोली येथे सर्वाधिक ४६.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे
-तर चंद्रपूरमध्ये ४६.४ अंश आणि वर्ध्यात ४६ अंश तापमान नोंदवले गेले.
बीडच्या परळी तालुक्यात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धर्मापुरीत रस्त्यावर दोन गट आमनेसामने भिडल्याने परिसरात एकच तणाव निर्माण झाला. वाद इतका टोकाला गेला की भररस्त्यात तलवारी काढून दहशत माजवण्यात आली. हातात तलवारी घेऊन शिवीगाळ आणि दमदाटी करतानाचा थरारक व्हिडिओ आता समोर आलाय.
- वर्ध्याच्या सेवाग्राम रोडवरील एसटी डेपो परिसरात आग
- स्पेअर पार्ट ठेऊन असलेल्या ठिकाणी लागली आग
- ई-बस चार्जिंग स्टेशनजवळ आग लागल्याने प्रशासनाची धावपळ
- अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू
नाशिकच्या मालेगाव मध्ये कमी झालेला तापमानाचा पारा आज पुन्हा वाढला
26.05.2026 रोजी
कमाल तापमान--43.0
किमान तापमान -25.4
- सोलापुरात ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक
- बेमुदत सुरू असलेल्या उपोषणाचे रास्ता रोकोत रूपांतर
- गोकुळ साखर कारखान्याने मागील दोन वर्षापासून ऊस बिले न दिल्याने शेतकरी आक्रमक
- मागील वर्षीचे दोन कोटी तर यंदाच्या वर्षीचे 130 कोटी थकवल्याने शेतकरी आक्रमक
- जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शांततेत सुरू असलेले उपोषणातील शेतकरी आक्रमक
- जिल्हा परिषदेत बाहेरील मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली
- आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना मंडपमारू नदिल्याने पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झाली होती झाटापट
- जोपर्यंत पोलीस शेतकऱ्यांची माफी मागणार नाहीत तोपर्यंत आंदोनापासून मागे नहटण्याची शेतकऱ्यांची भूमिका
डिझेलचा काळाबाजार करणाऱ्या विरोधात कठोर कार्यवाही करणारा
शेतकऱ्यांना इंधनाचा संदर्भात तक्रार असेल तर थेट माझ्या मोबाईलवर संपर्क साधा
हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन
हिंगोली जिल्ह्यात कोणतीही इंधन टंचाई नाही
नागरिकांनी खोटे अफवा पसरू नये
रत्नागिरीच्या कस्टम विभागाची मोठी कारवाई, कस्टम विभागाने पकडलेल्या बोटीचे नाव शहाना
जयगडच्या समुद्रात इंधन साठा आढळणाऱ्या मच्छिमारी बोटीची झाडाझडती
मच्छिमारी बोटी वर अवैधरित्या इंधनाचा साठा करून ठेवला जात असल्याचा संशय
मच्छिमारी हंगाम संपत आला असताना बोटीवर एवढा साठा कशासाठी? प्रश्न उपस्थित
कस्टम विभागाकडून इंधनाचा साठा सापडलेली बोट चौकशीसाठी घेतली ताब्यात
सापडलेली बोटीवर इंधनाचे 30 हून अधिक बॅरल, मच्छिमारी बोट गुहागर पडवे इथली असल्याचा संशय
बोटीवरील 5 जणांना घेतले चौकशीसाठी ताब्यात, सर्व जणांना चौकशीसाठी रत्नागिरीत आणल्याची माहिती-
गडचिरोलीत यावर्षी तापमान 46 अंशापेक्षा पलीकडे गेल्यामुळे नागरिक होरपळून निघत आहेत. अशात एका तरुण महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला. मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील ही महिला गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आली होती. आतापर्यंत जिल्ह्यात उष्माघाताचे 19 रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी 18 रुग्ण उपचारांती बरे झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी दिली.
वारकरी संप्रदायाविषयी कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते विकास लवांडे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. न्यायालयीन सुनावणीनंतर त्यांना दिलासा मिळाला असून जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा रंगली होती.
अकोल्यातील खुले नाट्यगृहासमोर एका महिलेने छेडछाड करणाऱ्या तरुणाला भररस्त्यात चप्पलेने चोप दिल्याची घटना घडली. गांधी रोडवर पायी जाणाऱ्या महिलेचा पाठीमागून हात लावल्याचा आरोप संबंधित व्यक्तीवर करण्यात आला. संतप्त महिलेने थेट पायातील चप्पल काढून त्याला मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती. नागरिकांनी महिलेच्या धाडसाचे कौतुक केले. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.
शेतकऱ्यांना स्वतःच्या वाहनासह ४० लिटरच्या कॅनमध्ये मिळणार डिझेल
यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश,इंधनाचा साठा करु नका, अफवांवर विश्वास ठेवू नका
शेत मशागतीसाठी शेतकऱ्यांना दिलासा,पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध
सहकार नेते आणि काँग्रेसचे माजी दर्यापूरचे तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांचा कार्यकर्ता मेळावा...
काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर सुधाकर भारसाकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार...
अमरावती जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का....
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्या उपस्थितीत सुधाकर भारसाकडे आपल्या समर्थकांसह शिंदे सेनेत करणार पक्षप्रवेश
सुधाकर भारसाकडे यांच्या कार्यकर्ता मेळावात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित.
दर्यापूर येथे सुधाकर भारसाकडे यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर आपल्या समर्थकांचा घेतला कार्यकर्ता मेळावा.....
विकास लवांडे यांच्या जामीन अर्जावर मेहेरबान कोर्टाने ऑर्डर केली असून “विकास लवांडे यांना ₹30,000 च्या जातमुचालक्यावर जामीन देण्यात आलं.
न्यायालयाकडून शिवराज मोटेगावकर ला एका दिवसाची सी बी आय कोठडी
मोटेगावकर याला उद्या कोर्टात पुन्हा हजर केलं जाणार
बीड मधून आज पर्यंत आपण मुलांना लग्नामध्ये फसवल्याच्या घटना पाहिल्या असतील किंवा बोगस लग्न लावणारी टोळी बघितली असेल मात्र बीडच्या मातोरी गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून चक्क पीएसआय असलेल्या नवरदेवानेच नवरीला फसवले असून लग्न अवघ्या काही दिवसा वरती आले असताना नवरदेवाकडून लग्नास नकार देण्यात आला आहे
चांदवडच्या खरेदी केंद्रावर अवघ्या २७ शेतकऱ्यांकडून कांदा विक्रीसाठी रजिस्ट्रेशन झालंय. नाफेडकडून जाहीर झालेल्या कमी भावामुळे शेतकरी नाफेड खरेदी केंद्राला कांदा विक्रीसाठी नेत नाहीये.
जनगणनेत ओबीसी समाजाचा समावेश व समाजावर अन्याय होऊ नये या विषयावर वाशिम येथे ७ जून रोजी सावता परिषदेच्या वतीने जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेत महाराष्ट्रातील सावता परिषद व विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज वाशिम येथील विश्राम गृहावर नियोजन बैठक पार पडली. यात सावता परिषदेचे वाशिम,अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी सहभागी झाले होते.
बीडच्या गेवराई शहरातील वाणी मंगल कार्यालय परिसरात मध्यरात्री एका घराला भीषण आग लागली. या आगीत घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं सदरील आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. घरमालक बाळासाहेब महामुनी यांचे दोन महिन्यांपूर्वीच सदरील घराचे बांधकाम पूर्ण झाले होते. तर महिना भरपूर्वीच घराची वास्तुशांती झाली होती. महामुनी कुटुंब देवदर्शनासाठी गेले असल्याने घरात कोण्ही नव्हते. त्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवित हानी झालेली नाही. शेजारील काही जनांनी आगीची घटना मोबाईल कॅमेरा मध्ये कैद केलीय. सदरील आग आटोक्यात आणण्यास अग्निशामक दलाला यश आले असले तरी अद्याप याचा पंचनामा झालेला नाही. त्यामुळे पंचनामा करून आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली जातेय.
बीडच्या गेवराई शहरातील वाणी मंगल कार्यालय परिसरात मध्यरात्री एका घराला भीषण आग लागली. या आगीत घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं सदरील आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. घरमालक बाळासाहेब महामुनी यांचे दोन महिन्यांपूर्वीच सदरील घराचे बांधकाम पूर्ण झाले होते.
तळोदा नगरपालिकेच्या पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत स्वच्छतेच्या मुद्द्यावरून माजी नगराध्यक्षा भाजप नगरसेविका रत्ना चौधरी आणि विद्यमान नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. माजी नगराध्यक्षा रत्ना चौधरी यांच्या घरी लग्नकार्य असल्याने त्यांनी पालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांची मागणी केली होती.
कांद्या प्रश्नी मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक
दोन्ही उपमुख्यमंत्री असणार उपस्थित
शेतकऱ्यांना डिझेल मिळावं यासाठी प्रयत्नशील
मराठवाड्यातील सर्वात मोठे असलेल्या हिंगोलीच्या संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हळद मार्केट डिझेल अभावी बंद करण्याची वेळ आली आहे, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची हळद खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने पुढील पाच दिवस हळद खरेदी विक्री बंद राहणार आहे, शेतकऱ्यांचा खरेदी केलेला माल बाहेर जिल्ह्यात पाठवण्यासाठी इंधन मिळत नसल्याने व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचं बाजार समिती प्रशासनाने सांगितल आहे
सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा इंधन खरेदी करण्यावर कोणतीही बंधन घालण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि कोणत्याही इंधनाचा साठा करून ठेवू नये असं आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेएन एस यांनी केलं आहे.
कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली येथे सुरू असलेल्या आंबा महोत्सवात आरमोरी येथील शेतकरी प्रमोद कांबळे यांनी तब्बल १ किलो ४०० ग्रॅम व १ किलो ३०० ग्रॅम वजनाचे ‘कलेक्टर’ जातीचे आंबे प्रदर्शित करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
विशाल आकार आणि आकर्षक स्वरूपामुळे या आंब्यांची महोत्सवात विशेष चर्चा रंगली. शेतकरी प्रमोद कांबळे यांनी आधुनिक पद्धतीने आंबा लागवड करत ‘कलेक्टर’ जातीच्या उत्पादनात यश मिळविले असून, त्यांच्या या उपक्रमाचे कृषी क्षेत्रातून कौतुक केले जात आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पंचवार्षिक निवडणूक
उमेदवार अर्ज छाननीत 60 जणांचे अर्ज वैध
अर्ज छाननी प्रक्रियेनंतरची वैध उमेदवारांची यादी जाहीर
अध्यक्ष मेघराज राजे भोसले, उपाध्यक्ष धनाजी यमकर, अभिनेत्री नीलम शिर्के अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यासह 60 जणांचे अर्ज वैध
अर्ज माघारीची प्रक्रियेला सुरुवात
15 कॅटेगरीमध्ये 17 जागांसाठी होत आहे निवडणूक
चांदवडमध्ये आंदोलनादरम्यान गोंधळ
चांदवड चौफुलीवर मुंबई-आग्रा महामार्ग ठप्प
रस्त्यावर कांदा ओतला
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
अनेक वाहने काही अंतरावर थांबली आहे,तर मनमाड मार्गे लासलगाव मार्गाने वाहने पाठवली जात आहे
अनेक कार्यकर्त्यांना रस्त्यात थांबले जात असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप
इंधन टंचाईच्या विरोधात शेतकरी एकवटले
एका तासापासून शेतकऱ्यांनी राज्यमार्ग रोखला
बँकेत नानीटांचाही कृषी केंद्रात खट टंचाई आणि पेट्रोल पंपावर इंधन टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ
जालन्यात काँग्रेसकडून मोदी सरकारच्या विरोधात झालमोरी आणि मेलोडी चॉकलेट वाटून आंदोलन करण्यात आलंय.जालना शहरातील बस स्थानक परिसरात काँग्रेसने आंदोलन केलय.गॅसटंचाई,पेपरलीक आणि इंधनदरवाढीच्या विरोधात झालमोरी आणि मेलोडी चॉकलेट वाटून वाटून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला आहे यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय
गणरायाची पंढरी असलेल्या रायगडच्या पेणमधून यंदा आतापर्यंत 35 हजार गणेशमूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत. आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे यंदा काही देशात गणेश मूर्ती पाठवणे अडचणीचं झालं होत परंतु नुकतीच गणेशमूर्तींची पाचवी खेप परदेशात गेली आहे. यात लंडन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फिजी, थायलंड, दुबई, मालदीव, इंडोनेशिया आदी देशांचा समावेश आहे. जे एन पी टी बंदरातून गणेशमूर्ती घेवून कंटेनर रवाना झाले आहेत.
मुंबई गोवा महामार्गाचे काम अर्धवट अवस्थेत असताना खारपाडा येथे सुरु केलेल्या टोल नाक्या विरोधात जन आक्रोश समितीने ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे ते अद्यापही पूर्ण झाले नाही. अर्धवट अवस्थेतील रस्त्यावर प्रशासनाकडून टोल वसूली सुरु करण्यात आली आहे. याचा निषेध करीत खारपाडा येथील ही टोल वसूली बंद करावी अशी मागणी या आंदोलनाद्वारे केली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकानी गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट
विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातही उष्णतेची लाट तीव्र झाली असून सिरोंच्या तालुक्यातील वटवाघळांच्या वसाहतीत ५००हून अधिक वटवाघळांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे
जनगणनेच्या कामासाठी प्रगनक म्हणून नियुक्ती केल्यानंतर शिक्षक गैरहजर राहिल्यामुळे धाराशिवच्या भूम येथे एका शिक्षकाच्या विरोधात कामात कसूर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भूम नगर परिषदेचे चार्ज जनगणना अधिकारी प्रवीण जाधव यांच्या तक्रारीवरून भूम येथील गुरुदेव दत्त हायस्कूलचे शिक्षक आबासाहेब ढगे यांच्या विरोधात भूम पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मावळच्या बधलवाडी परिसरात विहिरीत पोहताना १३ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
वंश नरेंद्र कुंदलवार असे मृत मुलाचे नाव आहे
परभणीत मागील ११ दिवसांपासून डिझेल टंचाई कायम, शेतकऱ्यांच्या पंपावर लांबच लांब रांगा
पाहते 3 पासून शेतकरी रांगेत पाच तास रांगेत उभा राहून 200 हजाराचे डिझेल
छत्रपती संभाजीनगर आणि जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद ही महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय उद्धवसेनेने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर २७ मे रोजी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी दिली.
करूळ घाटातून बिडाचे गोळे भरून आलेल्या भरधाव ट्रकने गगनबावडा बसस्थानक चौकात पाच वाहनांना धडक दिली. यामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अखिल रमजान थोडगे (वय २२, रा. कातळी) असे त्याचे नाव आहे. शिवाय दोन गायींचा सुद्धा या अपघातात मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.करूळ घाटातून आलेल्या भरधाव ट्रकने भक्त निवास इमारतीजवळ दुचाकीवर थांबलेल्या तरुणाला धडक दिली.
परभणी जिल्ह्यात मागील अकरा दिवसांपासून डिझेल टंचाई कायम असून शेतकरी आणि सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात ज्या पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध होत आहे, त्या ठिकाणी पहाटेपासूनच शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर आणि कॅनच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर डिझेल नसल्याची फलक लागले आहेत.
NEET पेपर फोडून या तिघींनी काही मालमत्ता खरेदी केली असल्याचा सी बी आयला संशय
तर २०२४ मध्ये झालेल्या पेपर फुटी प्रकरणात देखील याच आरोपींचा समावेश असल्याचा CBI ला संशय
२०२४ साली देखील फुटला होता NEET चा पेपर
या सगळ्या प्रकरणी पुण्यातील काही रिटायर प्राध्यापकांची देखील सी बी आय चौकशी करणार
सी बी आयाकडून काल पुन्हा मांढरे आणि हवालदार यांच्या घराची झाडाझडती घेतली त्यातून दोघींच्या घरातून काही सोने आणि चांदीचे दागिने सी बी आय ने केले जप्त केले आहेत.
वीज पडून 32 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
सेनगाव तालुक्यातील भानखेडा गावातील घटना..
रात्री शेतात मशागतीचे काम करत असताना वीज पडल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
हिंगोलीच्या कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये खुनातील आरोपीला घरचे जेवण देणे पोलीस कर्मचाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे, ही बाब सीसीटीव्ही फुटेज मध्ये निदर्शनास आली आहे, चक्क खुनातील आरोपीला जेवणाची मेजवानी मिळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस अधीक्षकांनी घरचा रस्ता दाखवला आहे, जगन पवार असे या निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून, पवार यांनी शासकीय सेवेच्या नियमांचा भंग केल्याचं पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांनी काढलेल्या आदेशात म्हटल आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आठवडाभरापासून डिझेल खरेदीसाठी वाहनधारकाच्या शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. कॅन घेऊन अनेक जण डिझेल घेऊन जात आहेत. तर दुसरीकडे पेट्रोल डिझेल पंप चालक डिझेल पेट्रोल नाही म्हणून पेट्रोल पंप बंद ठेवत असल्याचेही निदर्शनास आलेल्या आहे. या दोन्हीही वर लक्ष ठेवण्यासाठी आता प्रशासनाने आता नवा फंडा आखण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोलपंपांवरून होणाऱ्या डिझेल विक्रीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक पंपावर तलाठ्यांची नियुक्ती करण्याचा विचार प्रशासन करीत आहे. डिझेलचा साठा नेमका कुठे आणि किती प्रमाणात वापरला जातो
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार व अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या ग्राहक व्यवहार विभागाने नाशिक जिल्ह्यातील रब्बी कांदा खरेदीसाठी किमान आश्वासित खरेदी मूल्य अर्थात MAPP प्रतिक्विंटल 1580 रु. जाहीर केला आहे हे फक्त शेतकऱ्यांचा आंदोलन बघता त्यांचा रोष कमी करण्यासाठी सरकारने पाऊल उचलला आहे खरं तर कांदा उत्पादनासाठी प्रतिक्विंटल 1700 ते 2000 रुपये खर्च येत असताना सरकारने अतिशय कमी मूल्य हे जाहीर केला आहे जाहीर करत असताना राज्यात अनेक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी असताना फक्त हे नाशिक जिल्ह्यासाठीच का..? असा सवाल ही रविकांत तुपकर यांनी सरकारला विचारला आहे. कांद्यावर निर्यात शुल्क न लावता कांदा निर्यात केला पाहिजे तरच कांदा उत्पादक शेतकरी जगेल असेही रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.
बेंगलुरूहून राजस्थानकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसमधील तब्बल १९ लाख ५२ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड करण्यात वडगाव पोलिसांना यश आलं आहे. मध्यप्रदेशातून आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कांदा सोमवारी सायंकाळी ६ वाजता थेट बाजार समितीसमोर गंगापूर-वैजापूर मुख्य रस्त्यावर फेकून देत 'रास्ता रोको' आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.
चिखली शहर व तालुक्यात पेट्रोल-डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी आणि पेट्रोल पंप मालकांची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत इंधन पुरवठ्यातील अडचणींसह सुरू असलेल्या काळ्याबाजारावर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. आमदार महाले यांनी अवैध साठवणूक व काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देत प्रशासनाकडून ‘फिरते पथक’ तयार करण्यात आल्याची माहिती दिली. शेतकरी, रुग्णवाहिका व अत्यावश्यक वैद्यकीय सेवांना इंधन पुरवठा प्राधान्याने केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी अवैध विक्री किंवा साठवणुकीची माहिती थेट प्रशासन किंवा स्वतः त्यांच्याकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तुटवड्यानंतर झालेल्या दरवाढीचा परिणाम आता शहरातील हॉटेल व्यवसायावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसपासून ते कच्च्या मालाच्या वाहतुकीपर्यंत विविध घटकांच्या खर्चात वाढ झाल्याने अनेक हॉटेलचालकांनी मेनूचे दर वाढविले आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक हॉटेलांमध्ये खाद्यपदार्थांचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत.
हांडेवाडी रस्त्यावरील सातवनगर परिसरात मोटारीतून आणि झाडाझुडपांमध्ये लपवून ठेवलेला अडीच हजार लिटर गावठी हातभट्टी दारूचा साठा पोलिसांनी जप्त केला.
काळेपडळ पोलिसांनी ही कारवाई केली.
या प्रकरणी पोलिसांनी एका ५० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.सुनील हरी कचरावत (रा. सातवनगर, हांडेवाडी रस्ता) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
- नवतपाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ होरपळला , ब्रह्मपुरीचा पारा तब्बल ४७.६ अंशांवर
- नागपूर ४६.५°, भंडारा-गडचिरोली ४६.४°
- विदर्भात उष्णतेच्या लाटेचा जबरदस्त तडाखा
- ब्रह्मपुरी देशातील संयुक्तपणे सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये
- ‘एल डोराडो’च्या नोंदीनुसार ब्रह्मपुरी जगातील दुसरे उष्ण शहर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.