तामिळनाडूत शिवसेना स्टाईल बंड, अम्माच्या पक्षात उभी फूट

Power Struggle in AIADMK: तामिळनाडूत जयललिता गेल्या आणि अवघ्या 10 वर्षांत त्यांच्या पक्षाची वाताहत झाली...महाराष्ट्रात 2022 ला घडलं, तेच आता तामिळनाडूत घडतंय. अम्मांचा पक्ष दोन गटांत विभागला गेलाय, आणि या सगळ्यात किंगमेकर ठरतोय तो म्हणजे अभिनेता विजय थलापती....त्यामुळे AIDMKत फुट का पडली?
AIADMK faces major split as 30 MLAs extend support to Vijay Thalapathy ahead of crucial trust vote in Tamil Nadu.
AIADMK faces major split as 30 MLAs extend support to Vijay Thalapathy ahead of crucial trust vote in Tamil Nadu.saam tv
Published On

जे महाराष्ट्रात २०२२ ला शिवसेनेत झालं ते आज तामिळनाडूत जयललिताच्या AIADMKमध्ये झालं. हो अम्माच्या पक्षात उभी फूट पडलीय. जयललिलतांच्या निधनानंतर 10 वर्षांतच त्यांच्या AIADMKची पार दुरवस्था झालीय. तामिळनाडूच्या निवडणूकीत विजय थलपतीच्या एण्ट्रीनं सत्तेतील डीएमकेला घरी बसवलं तर भाजपसोबत युतीत लढलेल्या AIADMKला अवघ्या 47 जागा मिळाल्या. आता बुधवारी होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाच्या आधीच अम्माच्या पक्षात उभी फूट पडली आणि 30 आमदारांच्या गटानं थेट विजय यांना समर्थन दिल्यानं TVK आता 150 आमदारांच्या पाठिंब्याचा भक्कम पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. मात्र AIADMK मध्ये नेमकी कशामुळे फूट पडली ते पाहूयात..

जयललितांच्या पक्षात फूट

विजय यांच्या सत्तास्थापनेदरम्यान AIDMK च्या मागच्या दरवाजानं सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या. यात AIDMKचे सर्वेसर्वा पलानीस्वामी यांनी कट्टर आणि पारंपरिक शत्रू असलेल्या DMKसोबत चर्चा सुरू केली होती. मुख्यमंत्रिपदासाठी पलानीस्वामी यांनी पक्षाच्या तत्वांशी तडजोड केल्याचा आरोप षण्मुगन गटानं केला. त्यानंतर षण्मुगन यांनी थेट वेलुमणी यांच्या नेतृत्वाखाली 30 आमदारांचा गट स्थापन केला. आणि TVKला पाठिंबा जाहीर केला. पलानीस्वामी यांना आता केवळ १७ आमदारांचा पाठिंबा आहे.

यामुळे मात्र पलानीस्वामी यांची पक्षावरील पकड ढिली झाली असून त्यांच्या नेतृत्वात पक्षाची दोन शकलं झाली आहेत. जयललितांच्या निधनांनंतर AIDMKची कशी वाताहात झाली तेही पाहा.

डिसेंबर 2016

जयललितांच्या निधनांनंतर ओ.पनीरसेल्वम मुख्यमंत्री

जानेवारी 2017

शशिकला यांचे पक्षावर पूर्ण ताबा मिळवत नियंत्रण

फेब्रुवारी 2017

शशिकलांवर दबावाचा आरोप करत पनीरसेल्वम यांचे बंड

फेब्रुवारी 2017

शशिकलांनी पनीरसेल्वम यांना शह देण्यासाठी पलानीस्वामींना मुख्यमंत्री केलं.

ऑगस्ट २०१७

शशिकला तुरुंगात जाताच पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम एकत्र

सप्टेंबर 2017

पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम कडून शशिकलांचीच हकालपट्टी

मे 2021

पराभवानंतर पलानीस्वामींकडून पनीरसेल्वम यांनाही डावललं

जुलै 2022

शशिकला आणि दिनकरण यांच्याकडून नवीन पक्षाची स्थापना

फेब्रुवारी 2023

पलानीस्वामींकडे AIADMKचं एकहाती नेतृत्त्व

फेब्रुवारी 2026

पनीरसेल्वम थेट स्टँलिन यांच्या डीएमकेत सामिल

मे 2026

आता पुन्हा AIADMKमध्ये उभी फूट

आता AIADMK मध्ये जे बंड झालं ते तांत्रिकदृष्या कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतं. कारण पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार 47 पैकी दोन तृतीयांश आमदारांची संख्या ही ३२ इतकी असून सी.व्ही.षण्मुगम यांना २ आमदारांची साथ हवी आहे. आता हे २ आमदार त्यांना मिळवण्यात अपयश आलं तर त्यांच्या गटाला कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावं लागणार. अन्यथा सर्व ३० आमदारांची आमदारकी जाऊ शकते. मात्र यामुळे AIADMKची सध्याची अवस्था पाहून पुन्हा तामिळनाडूमध्ये डीएमके आणि टिव्हीके याच दोन प्रमुख पक्षांकडे राज्याची धुरा राहणार की AIADMKतच आणखी एखादा तारणहार जन्माला येणार याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com