

एअर इंडिया विमानाला मागच्या वर्षी अपघात झाला होता
अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर विमान कोसळलं होतं
या विमान अपघाताबाबत केंद्र सरकारने महत्वाची अपडेट दिली
फ्युएल कंट्रोल स्विचमध्ये बिघाड नव्हता, असे सरकारने सांगितले
अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात नेमका कशामुळे झाला होता यामागचे खरं कारण अद्याप समोर आले नाही. अशातच आज नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज राज्यसभेत महत्वाची अपडेट दिली. अहमदाबाद विमान अपघात फ्युएल कंट्रोल स्विचमधील बिघाडामुळे झाला नव्हता, अशी माहिती त्यांनी दिली. मागच्या वर्षी १२ जून रोजी हा विमान अपघात झाला होता. अहमदाबाद एअरपोर्टवरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत हे विमान कोसळलं होतं. या अपघातामध्ये २६० जणांचा मृत्यू झाला होता.
काँग्रेस खासदार जेबी माथेर हिशाम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, 'एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानाच्या फ्युएल कंट्रोल स्विच लॉकिंग मेकॅनिझममध्ये कोणतीही त्रुटी आढळून आलेली नाही. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने दिलेल्या आदेशानुसार सुरू असलेल्या हवाई योग्यता तपासणीचा एक भाग म्हणून सिएटल येथे मूळ उपकरण निर्माता स्तरावर फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी करण्यात आली, असे रॉयटर्सने वृत्त दिले आहे.'
त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, 'विमानाच्या फ्युएल कंट्रोल स्विचची, तसेच त्याच्या लॉकिंग डिटेंट्सच्या मजबुतीची सविस्तर तपासणी केली असता त्यात काहीही असामान्य गोष्ट आढळून आली नाही. फेब्रुवारीमध्ये या प्रकारच्या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातल्यानंतर सुरू असलेल्या हवाई योग्यता तपासणीचा एक भाग म्हणून या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. एआय-१७१ प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात सुरू आहे. एएआयबीचा अंतिम अहवाल पूर्ण झाल्यावर जाहीर केला जाईल आणि वेबसाईटवर अपलोड केला जाईल.'
तसंच,'फ्युएल कंट्रोल स्विचची सविस्तर तपासणी, ज्यामध्ये त्याच्या लॉकिंग डिटेंट्सच्या संरचनात्मक अखंडतेचाही समावेश आहे. त्यात 'कोणतीही विसंगती आढळून आली नाही. विमान अपघातामध्ये तपास ब्युरोने अंतिम अहवालास विलंब केलेला नाही. मोठ्या विमान अपघाताचा तपास वेळेवर होत नाही. नवीन पुरावे समोर येतात तसं तपास सुरूच राहतो. अपघाताची सर्व संभाव्य कारणे आणि त्यास कारणीभूत घटकांचा तपास सुरू आहे.', असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.