नवी दिल्ली : कंटेट क्रिएटर अभिनव अरोराचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांना जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य ओरडताना दिसत आहे. यामुळे अभिनव अरोरा चर्चेत आले आहेत. जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांचा व्हिडिओ जुना असल्याची माहिती मिळत आहे.
अभिनवला काही प्रश्न विचारण्यात आले. कृष्णाचा अर्थ काय? तर अभिनव म्हणाला, काला, श्याम. अभिनवने या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं होतं. तर दुसरा प्रश्न होता की, कृष्ण कोणत्या भाषेतील शब्द आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनव फिरवून बोलू लागला. मात्र,त्याने उत्तर दिलं नाही. तर तिसरा प्रश्न होता की, भगवान कृष्णाचं पूर्ण नाव काय? अभिनव म्हणाला, 'भगवान कृष्णाचं नाव कृष्ण आहे. मात्र, खरं उत्तर आहे, श्रीकृष्ण वासूदेव. १० वर्षांच्या अभिनवने फक्त एकाच प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं. कृष्णाच्या वडिलांचं नाव अभिनवने बरोबर सांगितलं.
सोशल मीडियावर अभिनव अरोराचा मोठा चाहता वर्ग आहे. युट्यूबवर त्याचे १.४७ लाख फॉलोवर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर ९.५ लाख आणि फेसबुकवर २.२९ लाख फॉलो करतात. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अभिनव अरोराला भारताचा सर्वात युवा अध्यात्मिक वक्त असल्याचं सांगितलं आहे.
अभिनवचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला ट्रोल करू लागले आहेत. अभिनवला लॉरेन्स गँगने जिवे मारण्याची धमकी दिली आहे. अभिनव दिल्लीतील खासगी शाळेत इयत्ता पाचवीत शिकत आहे. अभिनव सध्या अध्यात्मिक शिक्षण घेत आहे. त्याचं कुटुंब कृष्णा नगरमध्ये राहत आहे. अभिनवला धमकी मिळाल्यानंतर त्याचं कुटुंब दहशतीत आलं आहे लॉरेन्स गँगने त्याला धमकी दिल्यानंतर त्याची आई चिंतेत सापडली आहे. धमकीमुळे त्याला शाळेतही जाता येत नाहीये. त्याचे वडील लेखक आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.